Saturday, June 22, 2024

महाराष्ट्रात पुन्हा घुमणार बिग बॉसचा आवाज; ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग करणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता !!

संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) करणार आहे. कलर्स मराठी आणि JioCinema च्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेयर केला आला असून त्यामध्ये बिग बॉसचा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हिंदीमधल्या अफाट यशानंतर ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम मराठीतही सुरु झाला. “बिग बॉस मराठी”चा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांत जाऊन पोहोचला. प्रेक्षक या कार्यक्रमावर बेहद फिदा झाले. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सिझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकली आणि मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सिझनची जोरदार चर्चा झाली. आता त्याच ‘बिग बॅास’ मराठीच्या नव्या सिझनची जोरात तयारी सुरू झालीय.

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सोनी मॅक्सवर सूर्यवंशम चित्रपट सारखा का लागतो? जाणून घ्या चॅनेलशी असणारे खास नाते
जुनी साडी कस्टम ब्लाउज घालून कान्सला पोहोचली रत्ना पथक, पती नसीरुद्दीन शाहसोबत घेतली ग्रँड एन्ट्री

हे देखील वाचा