Saturday, June 29, 2024

‘वेड’ चित्रपटाने आयफा 2023मध्ये मारली बाजी; ‘या’ विशेष पुरस्काराने अभिनेता सन्मानित

अबुधाबी येथे 26 आणि 27मे रोजी ‘आयफा‘ हा पुरस्कार पार पडला आहे. हा पुरस्कार बाॅलिवूडमध्ये मानाचा पुरस्कार मानला जातो. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडतो. यंदाच्या वर्षी देखील ‘आयफा –2023’ हा सोहळा काल प्रचंड रंगला होता. या पुरस्कार सोहळ्यासा जवळ जवळ सर्वच कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. या पुरस्कार सोहळ्यात मराठीचा डंका वाजलेला दिसला आहे.

या सोहळ्याात रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आता वेड चित्रपटाने ‘आयफा’ (Full List Of IIFa Winner 2023) पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. त्याचवेळी त्या दोघांनी परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत.

बाॅक्स ऑफिसवर मराठी चित्रपटाने भरघोस कमाई केली आहे. गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेल्या वेड चित्रपटाने प्रचंड कमाई केली आहे. ‘वेड’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 74 कोटींची कमाई केली होती. आता हा चित्रपट ओटीटीवरही आपली जादू दाखवण्यासाठी लवकरच सज्ज होत आहे.

रॉमेंटिक ड्रामा असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच भूरळ घातली आहे. चित्रपटातील गाण्यांनी देखील प्रेक्षकांना अक्षरश: ‘वेड’ लावलं आहे. रितेश देशमुखने ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्याने पहिलाच चित्रपट इतका दमदार बनवला की, त्याचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले गेले. सोबतच या चित्रपटात रितेशने प्रमुख भूमिका साकारली आहे.

दरम्यान, सध्या आयफा 2023च्या पुरस्कार सोहळ्याचे खूप फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आपापले लाडके कलाकार पाहून प्रेक्षकही उत्साहित होत आहेत. ते या व्हिडिओ आणि फोटो भन्नाट कमेंट करत आहेत. (Ritesh Deshmukh’s dunk in IIFA 2023)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘जंगली रमीची जाहिरात करून…’, नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरचे रोखठोक उत्तर, म्हणाला…
जेव्हा ट्विंकल खन्नाच्या आईने अक्षय कुमारला ‘गे’ समजले तेव्हा लग्नाआधी अभिनेत्यासमोर ठेवली मोठी अट

हे देखील वाचा