आयफा अवॉर्ड्सची जोरदार तयारी सुरू आहे. स्टार्सने सजलेल्या या सुंदर पुरस्कार सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. यादरम्यान, जिच्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती अभिनेत्री म्हणजे ईशा गुप्ता. ईशाचा बाेल्ड लूक पाहून केवळ चाहतेच नव्हे, तर दिग्गज कलाकारही अवाक् झाले.
शुक्रवार, 26 मे रोजी आयफाच्या म्युझिकल नाईटचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये सलमान खान, रकुल प्रीत, नोरा फतेहीपासून अनेक स्टार्सनी आपले सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधले, पण त्यात सर्वाधिक लक्ष वेधले ते ईशा गुप्ता हिने. सिल्वहर चमकदार गाऊन आणि न्यूड नेकलाइनमध्ये, ईशा गुप्ताने बाेल्ड अंदाज दाखवून बाकीच्या अभिनेत्रींना जाेरदार टक्कर दिली.
IIFAच्या म्यूझिकल एक्स्ट्राव्हॅगांझा फंक्शनमध्ये ईशा गुप्ताचे सौंदर्य पाहण्यासारखे होते. तिने राखाडी रंगाचा शिमरी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. यासाेबतच तिने कानातले, ब्रेसलेट, अंगठी आणि मिलियन डॉलर स्माईलने तिच्या सुंदर लुकला पूरक केले. फॅशन डिझायनर स्टेला मॅकार्थीने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने आयफाच्या ग्रीन कार्पेटवर हजेरी लावली होती.
View this post on Instagram
चाहत्यांनी ईशा गुप्ताच्या लूकचे खूप कौतुक केले आहे. बहुतेक युजर्सना तिची स्टाइल स्टेटमेंट आणि ती कॅरी करण्याची पद्धत आवडली आहे. मात्र, काही युजर्स अभिनेत्रीला ट्राेल देखील करत आहेत. एका युजरने अभिनेत्रीच्या फाेटाेवर कमेंट करत लिहिले की, ‘असा ड्रेस का घालता, ज्यामुळे तुला वारंंवार झाकावे लागेल.’
ईशा गुप्ताने इमरान हाश्मीचा ‘जन्नत 2’ या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले हाेते. बॉलीवूडमधील ईशाची कारकीर्द फार मोठी नाही, परंतु अभिनेत्रीने आतापर्यंत केलेल्या सर्व कामांसाठी तिच्या चाहत्यांनी नेहमीच तिचे कौतुक केले आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘टिप्सी’ सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक तिजोरी यांनी केले आहे, तर निर्माते राजू चढ्ढा आहेत. (bollywood actress esha gupta shines in silver shimmery bodycon dress in iifa)