Saturday, June 29, 2024

‘जेव्हा मित्र तुम्हाला सोडून ट्रीपला जातात…’, म्हणत रोहित राऊतने शेअर केला ‘क्यूट’ फोटो

मराठी संगीत क्षेत्रातील तरुण आणि आघाडीचा गायक म्हणजे रोहित राऊत. तो त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. रोहितने ‘सारेगामापा लिटिल चॅम्स’ या शोमधून त्याच्या संगीत क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्र मुग्ध करणारा रोहित आता चांगलाच मोठा झाला आहे. ज्या ‘सारेगामापा’ने ओळख दिली, आज त्याच शोमध्ये तो परीक्षकाच्या भूमिकेत आहे. हीच काय ती रोहितची आतापर्यंतची मेहनत. रोहितने नुकतेच सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

रोहितने इंस्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो हँडसम तर दिसतच आहे, पण सोबतच तो खूपच क्यूट आणि निरागस दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहितने पांढरा टी-शर्ट आणि त्यावर लाल रंगाचे जॅकेट घातले आहे. यात तो खूपच हँडसम दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “तेव्हाचा लूक जेव्हा मित्र तुम्हाला सोडून ट्रीपला जातात.” यासोबतच त्याने मिताली मयेकर, जुईली जोगळेकर आणि नचिकेत लेले यांना या फोटोमध्ये टॅग केले आहे. त्याच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. तर मिताली मयेकरने या फोटोवर “क्यूट” अशी कमेंट केली आहे. (Rohit raut share a photo with cute and innocent look, on social media)

मागील काही दिवसांपासून मिताली मयेकर, जुईली जोगळेकर आणि नचिकेत लेले हे ट्रीपला गेले होते. तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये रोहित नव्हता. तो त्यांना सर्वांना खूप मिस करत होता.

रोहित राऊत हा मागील अनेक दिवसांपासून त्याच्या अफेअरमुळे खूप चर्चेत आहे. तो आणि जुईली जोगळेकर हे दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून येत आहेत. ते सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो देखील शेअर करत असतात. आज ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने दोघांनीही इंस्टाग्राम स्टोरीला‌ एकमेकांचे फोटो शेअर केले आहेत.

रोहित हा ‘इंडियन आयडल’मध्ये दिसला होता. जुईली जोगळेकर ही ‘सुर नाव ध्यास नवा’ या शोमधून पुढे आली आहे. रोहितने अनेक गाणी गायली आहे. त्याने ‘यारा यारा’, ‘शटरचा टाळा’, ‘मन मोहिनी’, ‘तू आहेस ना’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘गोलू मोलू’ या सारख्या गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा