चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर पहिला मोठा सिनेमे प्रदर्शित झाला ‘सूर्यवंशी’. तब्बल १८ महिने उशिरा प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफसवर ताबडतोड कमाई करत अनेक रेकॉर्ड तयार केले आहे. इतके महिने थांबल्याचे चीज झाल्याची भावना सिनेमाच्या संपूर्ण टीमची आहे. सूर्यवंशी सिनेमामुळे रोहित शेट्टी सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. रोहितला प्रेक्षकांची नस पक्की माहित असलयामुळे त्याचे सर्व सिनेमे हिट होतात. मसाला चित्रपटात हातखंडा असलेल्या रोहितने अजय देवगण, रणवीर सिंग, शाहरुख खान, अक्षय कुमार आदी मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका मुलाखतीदरम्यान रोहितने आगामी काळात कोणासोबत काम करायला आवडेल याबद्दल सांगितले आहे.
आजपर्यंतचा इतिहास बघता रोहितचे सर्व सिनेमे अमाप लोकप्रिय होतात. रोहित नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करताना दिसतो. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्याने त्याला कोणासोबत आता काम करायला आवडेल यावर भाष्य केले आहे. एका मोठ्या वृत्तपत्राच्या मुलाखतीदरम्यान त्याला विचारले गेले की, तो लवकरच सलमान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहेस. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला, “आता मी याबद्दल काहीच बोलू शकत नाही. मी आता यावर बोलणे खूप बेजबाबदार असेल. कारण सध्या माझ्याकडे कोणतीही कथा नाहीये. पण जेव्हा माझ्याकडे उत्तम कथा येईल तेव्हा मी नक्कीच मी या दोघांसोबत काम करेल. सध्या मी सर्कस आणि सिंघम या चित्रपटांवर माझे लक्ष केंद्रित केले आहे. २०१४ नंतर सिंघम सिनेमा आलाच नाहीये.”
पुढे सिंघम सिनेमाबद्दल सांगताना रोहित म्हणाला, “सिंघमसाठी आमच्याकडे खूप कथा आहेत. मात्र आम्ही अजून काहीच लिहायला सुरुवात केली नाही. सिंघम सिनेमाची बेसिक कथा देखील डोक्यात आहे. मात्र सिंघम माझा पुढचा प्रदर्शित होणार सिनेमा नसेल. लवकरच माझा सर्कस सिनेमा प्रदर्शित होणार आहे.”
काही माहितीनुसार सिंघम ३ हा सिनेमा कलम ३७० वर आधारित असू शकतो. यावर खऱ्या घटनादेखील दाखवल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा
-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर