Tuesday, July 9, 2024

रोहित शेट्टीने रणवीर सिंगला ‘सूर्यवंशी’मधून रोल कट करण्याची दिली धमकी, काय आहे प्रकरण?

रणवीर सिंगच्या ‘द बिग पिक्चर’ या शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या शोमध्ये सर्वसामान्यांपासून ते खास लोक सहभागी झालेले पाहायला मिळतात. या वीकेंडला ‘द बिग पिक्चर’च्या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये रोहित शेट्टी दिसणार आहे. रणवीर सिंग होस्ट करत असलेल्या या शोमध्ये चित्रपट निर्माता त्याच्या पुढच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसेल, ज्यात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात रणवीरचाही कॅमिओ आहे.

कलर्स चॅनलच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर ‘द बिग पिक्चर’चा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शेट्टी एका प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. तो रणवीरला म्हणतो की, जर त्याने प्रश्नाचे अचूक उत्तर दिले नाही तर त्याची प्रतिष्ठा पणाला लागेल. (rohit shetty threatens to cut ranveer singh role in sooryavanshi)

स्क्रीनवरील प्रश्नांकडे बघत रोहित रणवीरला म्हणतो, “यार हे वालं नाही आलं, तर हे खूप अपमानास्पद होईल.” रणवीर हसतो आणि म्हणतो, “हो, अपमान होईल, त्यामुळे तुम्हाला योग्य उत्तर द्यावे लागेल.” यावर रोहित म्हणाला, “तू माझ्यावर दबाव आणत आहेस.”

पुढे रोहित रणवीरला मदतीसाठी विचारत म्हणतो, “तू मदत करणार नाही का?” यावर अभिनेत्याने आपल्याला यासाठी परवानगी नसल्याचे सांगत मदत करण्यास नकार दिला. त्यावेळी, जर रणवीरने त्याला मदत केली नाही, तर तो ‘सूर्यवंशी’मधून रणवीरची भूमिका कट करेल, असा इशारा रोहितने दिला. तो म्हणाला, “हे बघ, अजून तो रिलीझ झाला नाही.” यावर रणवीर त्याला शांत व्हायला सांगतो.

‘सूर्यवंशी’ची पोलिस थीम लक्षात घेऊन, अनेक पोलिस प्रेक्षकांमध्ये बसल्याचेही प्रोमोमधून समोर आले आहे. रोहितने यापूर्वी पोलिसांवर आधारित तीन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्याने अजयसोबत ‘सिंघम’ (२०११) आणि ‘सिंघम रिटर्न्स’ (२०१४) बनवला आहे. त्याने नंतर रणवीरसोबत ‘सिम्बा’ बनवला. ‘सूर्यवंशी’ हा त्याचा चौथा चित्रपट आहे, जो अक्षयला पोलीस म्हणून सादर करेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Video: अक्षय कुमारसोबत डान्स करताना रणवीर सिंगला झाली दुखापत; ‘खिलाडी’ म्हणाला, ‘भविष्यातील नियोजन…’

-रणवीर सिंगचे मन जिंकणारे वक्तव्य; ‘द बिग पिक्चर’ शोमध्ये स्पर्धकाला सांगितला स्वत:चा अनुभव

-वामिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला नेटकऱ्यांनी विचारले, आई-बाबा कधी होणार?

हे देखील वाचा