Video: अक्षय कुमारसोबत डान्स करताना रणवीर सिंगला झाली दुखापत; ‘खिलाडी’ म्हणाला, ‘भविष्यातील नियोजन…’

अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. एका चित्रपटाचे शूटिंग संपत नाही की, तोपर्यंत तो लगेच दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग सुरू करतो. मात्र, एवढा व्यस्त असतानाही आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करणे तो कधीही विसरत नाही. तसेच तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि त्याच्या चाहत्यांसाठी सतत काही ना काही पोस्ट शेअर करत राहतो. आपल्या पोस्टद्वारे कधी तो लोकांना जागरूक करतो, तर कधी तो त्याच्या चित्रपटांशी संबंधित पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

अलीकडेच ‘खिलाडी’ अक्षयने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो त्याच्या आगामी ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय रणवीर सिंगसोबत त्याच्या ‘बाला’ या प्रसिद्ध गाण्याचे हुक स्टेप करताना दिसत आहे. मात्र, ती हुक स्टेप बाला या गाण्यावर नाही, तर ‘आयला रे आयला’ या गाण्यावर त्यांनी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

व्हिडिओमध्ये लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की, जेव्हा रणवीर अक्षयचे हुक स्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचा हात चुकीच्या जागी जातो. त्यानंतर तो हसून परत फिरतो. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. रणवीर आणि अक्षय व्यतिरिक्त, अजय देवगण आणि उर्वरित टीम देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अजय त्यांच्याबरोबर नाचत जरी नसला, तरीही तो बाजूच्या खुर्चीवर बसला आहे. तसेच ‘आयला रे आयला’ हे नुकतेच प्रदर्शित झालेले ‘सूर्यवंशी’मधील गाणे आहे.

हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने एक चेतावणीही दिली आहे की, “जर ही हुक स्टेप चुकीची झाली, तर तुम्ही तुमचे भविष्यातील नियोजनही बिघडू शकता.”

व्हिडिओसोबतच अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “हा माझा आणि रणवीर सिंगचा ‘आयला रे आयला’ या गाण्याचे हुक स्टेप आहे. आता यावर तुम्ही सुंदर नृत्य करा आणि मला दाखवा. चेतावणी- ही हुक स्टेप चुकीची केली तर, तुमच्या भविष्यातील नियोजनासाठी हानिकारक ठरू शकते.”

अक्षयच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज आणि २० लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओह माय गॉड २’ चित्रपटाची शूटिंग सुरू; पंकज त्रिपाठींसोबत दिसला अक्षय कुमार, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-अरे व्वा! ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाचे पहिला पोस्टर रिलीझ, पाहायला मिळाले अक्षय कुमारचे ‘महादेव’ रूप

-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

Latest Post