Wednesday, July 3, 2024

एका मेसेजने बदलले रोहमन शॉलचे आयुष्य, थेट मिस युनिव्हर्सच पडली होती प्रेमात

मॉडेल रोहमन शॉल हा प्रसिद्ध मॉडेल आहे. त्याने आतापर्यत अनेक कार्यक्रमामध्य प्रसिद्ध डिझायनरसाठी रॅंप वॉक केलं आहे. मात्र, बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि पूर्व मिस युनिवर्स सुष्मिता सेन हिच्यासोबत नात्यामध्ये आल्यानंतर रोहमनला जगभरात जास्त ओळख मिळाली. आज (दि, 04 जानेवारी) रोजी रोहमन आपला वाढदिवस साजरा करत आहे. चला तर त्याच्या या खास दिवशी त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया.

मॉडेल रोहमन शॉल (Rohman Shawl) याचा जन्म 1991 मध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये झाला होता.  त्याने आपले सुरुवातीचे शिक्षणही इथूनच केले होते. रोहमनला लाहानपणापासूनच काहीतर वेगळं कारायचं होतं. हळूहळू त्याचे लक्ष इंडस्ट्रीमध्ये वळू लागले आणि त्याला या कामात आवड निर्माण झाली. यानंतर त्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईकडे धाव घेतली. स्वप्न नगरी म्हणून ओळखल्या जाणऱ्या मुंबईने रोहमनला संधी दिली आणि रोहमनच्या फिगर आणि लूकमुळे त्याला मॉडेल म्हणून काम मिळू लागले.

साल 2018 पासून रोहमनाचे नाव चार्चेत येण्यास सुरुवात झाली कारण तेव्हा त्याचे नाव सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्यासोबत जोडले जायचे. दोघांची लव्हस्टोरी देखिल खूपच हटके आहे. रोहमन देखिल लाखो चाहत्यांप्रमानेच सुष्मिताचा मोठा चाहता होता. तो देखिल सामान्य लोकांप्रमाने अभिनेत्रीला इस्टाग्रामवर मेसेज करायचा मात्र, सुष्मिता चाहत्यांचे पर्सनल मेसेज पाहात नव्हती. पण एक दिवस सुष्मिताकडून चुकीने रोहमनचा मेसेज उघडला आणि तिथेच रेहमनचं आयुष्य खुललं.  तिने मेसेज वाचल्यानंतर रोहमनला रिप्लाय देखिल दिला. यानंतर रोहमनचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने पुन्हा एकदा मेसेज केली की, “तुमच्या मेसेजने माझा दिवस बनवला. त्याशिवाय मी आनंदाने उड्या मारत आहे,” असंही रोहमनने सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

सुष्मिताला रोहमनचे बोलने आवडू लागले आणि देघांमध्ये मेसेज वाढू लागले हळूहळू दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. यानंतर रोहमनने सुष्मिताला फुटबॉल मॅच बघण्यासाठी बोलवले. आणि सुष्मिता देखिल मॅच बघण्यास गेली आणि दोघांची पहिली भेट झाली. या भेटीनंतर सुष्मीताला रोहमन एवढा आवडला की, तिच्यापेक्षा 15 वर्षानी लाहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. हे दोघे अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते मात्र, आता यांचे ब्रेकअप झाले आहे. भले त्यांचे नाते संपले असले तरी त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते कायमच आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गुरमीत आणि देबिनाने ठेवले आपल्या दुसऱ्या मुलीचे ‘हे’ खास नाव, मुलीचा फोटो शेअर करत दिली माहिती
‘या’ मोठमोठ्या कलाकारांनी घेतला कधीही पालक न बनण्याचा निर्णय, आरडी बर्मनही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा