Saturday, June 29, 2024

हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिता दिसली एक्स बाॅयफ्रेंडसाेबत, व्हिडिओ व्हायरल

या महिन्याच्या सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अभिनेत्री सुष्मिता सेन हिने पहिल्यांदाच मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये सार्वजनिकपणे हजेरी लावली. कार्यक्रमाच्या बाहेर पडताना अभिनेत्रीसाेबत रोहमन शॉल देखील दिसला. सुष्मिता आणि रोहमन यांनी कथितरित्या ब्रेकअप केल्यानंतर ते मित्र बनले आहेत. अशात आता चाहते दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

साेशल मीडियावर व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये, सुष्मिता सेन (sushmita sen) पिवळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे, तर तिच्या शेजारी पांढऱ्या ब्लेझरमध्ये रोहमन शॉल आहे. राेहमन अभिनेत्रीसाेबत चालताे आणि नंतर तिच्याबराेबर निघून जाताे. मात्र, जाण्यापुर्वी सुष्मिता चाहत्यासाेबत सेल्फी काढते. यादरम्यान एक पॅपराझी अभिनेत्रीला म्हणताे, ‘तुम्ही खूप स्ट्रॅंग आहात.’ यावर सुष्मिता हसत म्हणते, “माझ्यावर खूप लोकांचा आशीर्वाद आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

अभिनेत्रीने घरी जात्या क्षणी थेट कारमध्ये लाईव सेशल ठेवला, ज्यामध्ये तिने तिच्या अनुभवाबद्दल सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “मी नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये शोस्टॉपर म्हणून अविश्वसनीय अनुश्री रेड्डीसाठी वाॅक पूर्ण केला. मी खूप धन्य मुलगी आहे.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी अनुश्रीचे आभारी आहे जिने मला यायला आणि  शोस्टॉपर व्हायला प्राेत्साहीत केले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

हृदयविकाराच्या झटक्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 2 मार्च रोजी सुष्मिताने तिला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी दिली. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले की, “मला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टी झाली आहे, स्टेंट बसवला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ञांनी मला सांगितले आहे की, ‘माझे हृदय मोठे आहे.’”

अभिनेत्रीने पुढे लिहिले, “मी अनेक लोकांचे वेळेवर मदत आणि तत्पर कारवाईसाठी आभार मानू इच्छिते. या लोकांसाठी मी दुसरी पोस्ट शेअर करेन. ही पोस्ट फक्त माझ्या शुभचिंतक व जवळच्या प्रियजनांसाठी आहे. आता मी अगदी मस्त आहे ही आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती. मी पुन्हा आयुष्य जगण्यासाठी तयार आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.”

मंडळी आम्ही तुम्हाला सांगताे, वयाच्या 47 व्या वर्षीही अभिनेत्री तिच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेते. ती अनेकदा व्यायाम करताना दिसते. अभिनेत्री तिचे फिटनेस संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते.(rohman shawl remains bollywood actress sushmita sen friend even after the breakup watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान रॅपर कोस्टा टिच याचे निधन; मृत्यूच्या आधीचा व्हिडीओ व्हायरल

‘माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली…,’ महिलेचा खळबळजनक दावा

हे देखील वाचा