एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मीडियावरील सुरुवातीच्या प्रतिक्रिया पाहता, असे दिसते की राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) या दोघांनीही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एकीकडे हा चित्रपट जरूर पाहावा असे सांगितले जात असताना, दुसरीकडे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाइन लीक झाला आहे.
राजामौलींना मोठा बसला धक्का
एसएस राजामौली यांचा चित्रपट ‘आरआरआर’ प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच इंटरनेटवर HD मध्ये लीक झाला. या बातमीमुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो. अर्थात, एखाद्या मोठ्या चित्रपटाच्या ऑनलाइन लीकचा त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होतो. ‘आरआरआर’ हा ३५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच त्याचे बजेट काढले आहे.
ऑनलाईन झाला लीक
ऑनलाईन वेबसाइटवर ‘आरआरआर’ लीक झाला आहे. युजर हा चित्रपट विना अडचणीचा डाउनलोड करून पाहत आहेत. त्याचवेळी, काही चाहते लोकांना विनंती करत आहेत की, त्यांनी असे करू नये आणि चित्रपटगृहांमध्येच चित्रपट पाहावा. मात्र, या आवाहनाचा फारसा परिणाम होणार नाही. अनेकांनी हा चित्रपट डाउनलोड करून पाहिलाही आहे.
‘हे’ चित्रपटही झाले आहेत लीक
‘आरआरआर’ हा ऑनलाईन लीकला बळी पडलेला पहिला चित्रपट नाही. अलीकडेच प्रभास आणि पूजा हेगडे अभिनित ‘राधे श्याम’ देखील चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच ऑनलाइन लीक झाला होता. यापूर्वी ‘८३’, ‘पुष्पा’, ‘भीमला नायक’ यांसारखे मोठे सिनेमेही ऑनलाइन लीक झाले आहेत.
चित्रपटाची आहे तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण एकत्र दिसणार आहेत. दोघांचेही दक्षिण आणि उत्तरेत जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ‘गंगूबाई’ नंतर आलिया भट्टची लोकप्रियता खूप वाढली असून, दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील हा आलियाचा पदार्पण चित्रपट आहे. अशा स्थितीत चित्रपटाला आणखी फायदा होण्याची अपेक्षा आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर एकाच चित्रपटात असल्याने चाहतेही खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत बॉलिवूड स्टार अजय देवगणही दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –