RRR | गुजरातला पोहोचली टीम, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ समोर प्रमोशन करणारा पहिला चित्रपट बनला ‘आरआरआर’

प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. नेहमीच विविध कारणांनी सध्या हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. आता या चित्रपटाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. ‘आरआरआर’ चित्रपटात सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक दाखवण्यात येणार आहे. यांंसंबंधीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Jr.NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी एसएस राजामौली यांनी ‘बाहुबली’ सारख्या बहुचर्चित चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत, कमाइचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले होते. सध्या त्यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या चित्रपटात राम चरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटासंबंधी सध्या अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपटातील एका गाण्यात गुजरातमधील प्रसिद्ध स्टॅचू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा दाखवण्यात येणार आहे. यासंबंधीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली, ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण या पुतळ्याला भेट देताना दिसत आहेत. त्याचबरोबर पुतळ्याच्या समितीनेही ‘आरआरआर’च्या टीमचे स्वागत केल्याचे दिसत आहे. या बातमीमुळे आता स्टॅचू ऑफ युनिटीला चित्रपटात दाखवणारा ‘आरआरआर’ हा पहिलाच चित्रपट ठरणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काय आहे स्टॅचू ऑफ युनिटी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात तयार झालेल्या स्टॅचू ऑफ युनिटीतचे जगभर चर्चा झाली होती. भारताचे पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिकृती असलेला हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. हा पुतळा हे भव्य दिव्य स्मारक आक्टोंबर २०१८ मध्ये बांधून पुर्ण झाले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिवशी म्हणजेच ३१ आक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. आता पहिल्यांदाच हे स्मारक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २५ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post