Saturday, April 20, 2024

काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत बांधली सोनाली खरेने लगीनगाठ

आज सोशल मीडिया हे माध्यम इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे की, त्यामुळे कलाकारांच्या आयुष्यातील अनेक लहान मोठ्या गोष्टी अगदी सहजच फॅन्स आणि लोकांपर्यंत पोचताना दिसतात. या सोशल मीडियाच्या काळात कोणतीही गोष्ट गुपित ठेवणे सोपे राहिलेले नाही. या माध्यमाचे महत्व आणि पोहोच लक्षात घेऊन कलाकारांनी देखील या माध्यमाचा त्यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेतही वापर करून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला आज जास्त माहित नाही. त्यांच्या कुटुंबाबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही. याचे कारण ते कलाकार इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय असताना सोशल मीडिया तेवढे मोठे झाले नव्हते मात्र आता याच माध्यमामुळे आपल्याला आपल्या आवडत्या जुन्या नव्या सर्वच कलाकारांबद्दल माहिती मिळते.

मराठी इंडस्ट्रीमधील अशीच एक आघाडीची आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे. सोनालीने तिच्या उत्तम अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर मराठीमध्ये मोठे नाव कमावले आहे. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच सोनाली एक फिटनेस फिक्र अभिनेत्री आहे. सोनालीचा कमालीचा फिटनेस पाहून आजही अनेकांना तिच्या वयाबद्दल प्रश्न पडतो. सोनालीने अनेक हिंदी, मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणाऱ्या सोनालीने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने तिच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स केली, मात्र तिच्या नवऱ्याबद्दल ज्यांना माहित नाही त्यांना अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. सोनाली खरेने हिंदी चित्रपट आणि मालिकेमधील अभिनेते बिजय आनंद यांच्याशी लग्न केले आहे. बिजय हे हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. बिजय यांनी अजय देवगण आणि काजोल यांच्या ‘प्यार तो होना ही था’मध्ये काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती.

पुढे बिजयने काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेतला असल्याचे म्हटले जात होते. ते केवळ मालिकांमध्ये काम करताना दिसत होते. त्यानंतर तब्बल १६ वर्षे त्यांनी कोणतीही मालिका किंवा चित्रपटामध्ये काम केले नाही. ‘दिल ही तो है’ या मालिकेतून त्यांनी पुनरागमन केले. सोनाली आणि बिजय यांची ओळख ‘रात होने को है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. पुढे त्यांनी दोघांनी लग्न केले त्यांना सनया नावाची एक मुलगी देखील आहे. बिजय हे एका पंजाबी कुटुंबातून आले आहे. ते देखील फिटनेस प्रेमी आहे. त्यांचे योगावरचे प्रेम अनेकदा व्यक्त करताना ते दिसतात.

फिटनेसचे लोकांच्या आयुष्यातील महत्व लक्षात घेऊन सोनाली खरेने ‘वॉव विथ सोनाली’ हे युट्यूब चॅनेल सुरू केले. त्यावरून मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांचे फिटनेसचे फंडे चाहत्यांबरोबर शेअर केले जातात. हे फिटनेसचे फंडे प्रेक्षकांनाही आवडतात, त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच या चॅनेलने अल्पावधीतच २५ हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा