रुबीना दिलैकने आयुष्याला म्हटले ‘सुंदर डान्स’, फोटोवर पडतोय लाखो लाईक्सचा पाऊस


‘बिग बॉस 14’ ची विजेती स्पर्धक आणि प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक ही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या वैयक्तिक अथवा व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा चाललेल्या असतात. रुबीनाचे नुकतेच काही दिवसांपूर्वी एक गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यात ती ‘बिग बॉस 13’ फेम पारस छाबडा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. रुबीना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रुबीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने एक सुंदर लेहंगा‌ परिधान केला आहे. यासोबतच तिने एक स्टायलिश पेस्टल ब्लाऊज परिधान केला आहे. तसेच तिच्या मरून वेलवेट बुट्सने तिचा हा लूक परिपूर्ण केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला आहे.

रुबीनाने हा फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “जीवन एक सुंदर नृत्य आहे.” तिचे सगळे चाहते सोशल मीडियावर तिच्या या फोटोचे आणि कॅप्शनचे खूप कौतुक केले आहे. तिच्या या फोटोला 3 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे.

रुबीना काही आठड्यांपूर्वी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळली होती. ती शिमलामध्ये होती. तिने स्वतःला क्वारंटाईन केले होते. तिने तिच्या चाहत्यांना प्रत्येक क्षणाचे अपडेट दिले होते. दुसरीकडे तिचा पती अभिनव शुक्ला केपटाऊनमध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ या शोची शूटिंग करत आहे.

याआधी रुबीनाचे ‘मरजानिया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्ला याच्यासोबत दिसत आहे. रुबीना लवकरच कलर्सवरील ‘शक्ती’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचे प्रोमो देखील रिलीझ झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेग्नंसीच्या वृत्तांमध्ये समोर आला अभिनेत्रीचा बेबी बंपसोबतचा पहिला फोटो; ६ महिने गरोदर असल्याचा दावा

-‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; नेहमीप्रमाणेच सायरा बानो यांची होती त्यांना साथ

-‘मीच माझ्या स्वप्नातली स्त्री!’, भाग्यश्री मोटेच्या हॉट ऍंड ब्यूटीफुल फोटोसोबतच लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत


Leave A Reply

Your email address will not be published.