टेलिव्हिजनवरील मालिकांमधून आपल्या करिअरला सुरुवात केलेली अभिनेत्री म्हणजे रुबीना दिलैक. रुबीनाने अनेक पात्र निभावून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता रुबीना कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाही. बिग बॉस १४ चा प्रवास करून तिने तिचे नावलौकिक मिळवले आहे. त्यात बिग बॉसची विजेती स्पर्धक असल्याने तिची लोकप्रियता जरा जास्तच आहे. बिग बॉसनंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. घरातून बाहेर पडल्यांनंतर तिने अनेक म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. तिचे अनेक अल्बम प्रेक्षकांना आवडले देखील आहेत. तसेच रुबीना सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटोशूट ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच काही दिवसांपूर्वी तिचे एक गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्या गाण्यामध्ये ती तिचा पती अभिनव शुक्लसोबत दिसत आहे. या गाण्याचा पोस्टर तिने या आधीच शेअर केला होता. या पोस्टरला देखील तिच्या चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. या गाण्याचे नाव ‘तुम से प्यार है’ हे आहे. या गाण्याला देखील जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. या गाण्यात रुबीना आणि अभिनवची ग्रामीण लव्हस्टोरी दाखवली आहे. तसेच त्यांचा गेटअप देखील तसाच आहे. हे गाणे यूट्यूबवर प्रदर्शित होऊन केवळ ५ दिवस झाले आहे. पण या गाण्याला आतापर्यँत १५ मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच दर्शक आणखी पसंती दर्शवत आहेत.
रुबीनाने या गाण्यातील लूकमधील तिचे काही फोटो शेअर करून या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने लिहिले आहे की, “सगळ्या चाहत्यांनी तुम से प्यार है या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी खूप धन्यवाद.” (rubina dilaik share post and give thanks to fans for giving responce ti her new song)
रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच याआधी रुबीनाचे ‘मरजानीया’ आणि ‘गलत’ हे गाणे रिलीझ झाले होते. मरजानिया गाण्यात ती तिचा पती अभिनव शुक्लासोबत दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…