बिग बॉस विनर..!! तब्बल २० आठवड्यांची प्रतिक्षा संपली, प्रेक्षकांना मिळाला ‘बिग बॉस १४’चा विजेता; पाहा कोण जिंकलंय

बिग बॉस विनर..!! तब्बल २० आठवड्यांची प्रतिक्षा संपली, प्रेक्षकांना मिळाला 'बिग बॉस १४'चा विजेता; पाहा कोण जिंकलंय


‘बिग बॉस 14’ चा सीझन अनेक मार्गांनी खास ठरला आहे. 20 आठवड्यांपर्यंत चाललेल्या बिग बॉसच्या या सीझनमध्ये बरेच चढउतार पाहायला मिळाले. यामध्ये जुन्या सीझनमधील स्पर्धकही आपल्याला पाहायला मिळाले होते.

अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर बिग बॉस 14 चा निकाल लागला आहे. राहुल वैद्यचा पराभव करून रुबीना दिलैक ही या सीझनची विजेती ठरली. अंतिम फेरीत हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या वातावरणात 5 अंतिम स्पर्धकांमधील विजयी स्पर्धक म्हणून रुबीनाला घोषित करण्यात आले.

रुबीना दिलैकला बिग बॉसच्या ट्रॉफीसह 36 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. शोच्या सुरुवातीपासूनच रुबीना दिलैक ही चाहत्यांची आवडती होती. ती या शोमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती.

बिग बॉस 14च्या ग्रँड फिनालेची सुरुवात नेहमीप्रमाणेच सलमान खानच्या जबरदस्त एन्ट्रीने झाली. बिग बॉस 14 च्या अंतिम फेरीत 5 स्पर्धक बाकी होते. रुबीना दिलैक, राहुल वैद्य यांच्यासह अली गोनी, निक्की तांबोळी आणि राखी सावंतही टॉप 5 मध्ये पोहचले होते.

राखी सावंत यावेळी शोची सर्वात मोठी एन्टर्टेनर ठरली. तसेच राखी 14 लाख इतकी रक्कम घेऊन शोमधून बाहेर पडली. त्यांनतर अली गोनीला कमी वोट मिळाल्यामुळे तो शोमधून बाहेर झाला. टॉप 3 मध्ये पोहचल्यानंतर मतांच्या अभावी निक्की तांबोळीही शोमधून बाहेर पडली. शेवटच्या फेरीत राहुल आणि रुबीना हे दोन स्पर्धक उरले. सलमान खानने विजेत्याच्या हात उचलून बिग बॉस 14 चा विजेता घोषित केला. अशाप्रकारे, बिग बॉस सीझन 14ला त्याच्या विजेता मिळाला.

स्पर्धकांमध्ये ट्रॉफी जिंकण्याची स्पर्धा पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळाली. प्रत्येकाने आपापल्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. हा शो अनेक आठवड्यांपासून टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला. फिनालेच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रुबीना दिलैक आणि राहुल वैद्य यांचे चाहते दोन गटात विभागलेले पाहायला मिळाले.

अखेर आता 4 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ‘बिग बॉस’चा सीझन 14 आता संपणार आहे. बिग बॉस शोचा शेवट हा शोमधल्या सदस्यांसाठी एक भावनिक क्षण होता. कालच्या भागात सर्व स्पर्धकांचा बिग बॉस प्रवास दाखवण्यात आला होता. ज्याला पाहून प्रत्येकजण भावूक झाला.


Leave A Reply

Your email address will not be published.