‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रुचिरा जाधव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इतकेच नव्हे, तर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेट बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. नुकताच रुचिराने शेअर केलेला एक फोटो अवघ्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
खरं तर रुचिरा जाधवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात रुचिराने साडी परिधान केली आहे. शिवाय ती यात अतिशय मस्त अंदाजात पोझ देताना दिसत आहे. साडीमध्येही रुचिरा बऱ्यापैकी हॉट दिसत आहे. तसेच साडीमध्ये तिचे सौंदर्य खुलले आहे.
रुचिराने ही पोस्ट शेअर करताच, ती व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती. या फोटोमधील खास बाब म्हणजे याचे कॅप्शन होय. अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणतेय की, “जर, आई जेवण बनवून झालं गं, याला चेहरा असता तर.” नेटकऱ्यांना फोटोसोबत हे मजेदार कॅप्शन देखील खूप आवडलं आहे. यावर चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळत आहेत.
रुचिराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत झळकली होती. यात तिने मायाची भूमिका साकारली होती, जिचे खूप कौतुक करण्यात आले होते. तिने ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’ यासारख्या अनेक मालिकांमध्येही रुचिरा दिसली आहे. शिवाय तिने ‘लव लफडे’, ‘सोबत’ या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत
-घरामध्ये आई जया बच्चनला नाही, तर बायको ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक बच्चन, बहीण श्वेताने केला खुलासा
-या टॉप बॉलिवूड अभिनेत्रींच्या नवऱ्यांना डेट करू इच्छिते भूमी पेडणेकर; नाव ऐकाल तर व्हाल हैराण