या टॉप बॉलिवूड अभिनेत्रींच्या नवऱ्यांना डेट करू इच्छिते भूमी पेडणेकर; नाव ऐकाल तर व्हाल हैराण


बॉलिवूडमधील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून भूमी पेडणेकर ओळखली जाते. भूमीने खूप कमी कालावधीत तिच्या अभिनयाने स्वतःला या क्षेत्रात सिद्ध केले आहे. सहाय्यक कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम करत असलेल्या भूमीने ‘दम लगा के हैशा’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पहिल्याच सिनेमात आव्हानात्मक भूमिका निभावत भूमीने समीक्षक आणि प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. अनेकदा पठडीबाहेरील भूमिका साकारणारी भूमी एक सशक्त अभिनेत्री म्हणून समोर आली आहे.

भूमीने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सर्वच प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. यादरम्यान भूमीला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचे उत्तर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. भूमीला या मुलाखतीमध्ये विचारले की, तिला कोणत्या व्यक्तीला डेट करायला आवडेल? यावर भूमीने सांगितले की, तिला अनुष्काचा नवरा असलेल्या विराट कोहलीला डेट करायला आवडेल.

याशिवाय तिला विचारण्यात आले की, तिला कोणत्या अभिनेत्रींच्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला डेट करायला आवडेल. यावर तिने सांगितले की, तिला प्रियांका चोप्राचा पती निक जोनासला डेट करायला आवडेल. ती पुढे म्हणाली, “निक खूपच मस्त आणि क्युट आहे. मी खूप पूर्वीपासून त्याची गाणी ऐकत आली आहे. त्याच्या गाण्यांची मी खूप मोठी फॅन आहे. त्याचे गाणी आणि त्याचे लूक्स मला नेहमी आकर्षित करतात. त्यामुळे मला निकला डेट करायला खूप आवडेल.”

भूमी काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरी झाली आहे. तिने स्वतः कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. सध्या भूमी तिच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, व्यायाम करत तिचा स्टॅमिना वाढवत आहे. यासंदर्भातला एक फोटो भूमीने सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

भूमीने २०१५ साली या इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती. आपल्या अवघ्या ६ वर्षाच्या करियरमध्ये भूमीने अतिशय मोठ्या कलाकारांसोबत काम करत, तिच्या अभिनयाची मोहिनी प्रेक्षकांवर घातली. तिने आतापर्यंत ‘शुभमंगल सावधान’, ‘बाला’, ‘सांड की ऑंख’, ‘दुर्गामती’ आदी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. लवकरच ती अक्षय कुमारसोबत आनंद एल राय यांच्या ‘रक्षाबंधन’ सिनेमात दिसणार असून, सोबतच ‘बधाई दो’, ‘मिस्टर लेले’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट


Leave A Reply

Your email address will not be published.