बिग मराठी हा कलर्स मराठीवरील एक बहुचर्चेत शो आहे. नुकतेच या शोमधील टॉप स्पर्धकांनी १०० दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे आणि या शोचा ग्रँड फिनाले झाला आहे. शोमध्ये अखेर जय, विकास, विशाल, उत्कर्ष आणि मीनल हे टॉप ५ स्पर्धक उरले होते. हे पाचही स्पर्धक एकमेकांना टक्कर देत होते. अशातच प्रेक्षकांचे मत मिळवण्यात विशाल निकम उजवा ठरल्याने तो या तिसऱ्या पर्वाचा विजेता झाला आहे.
घरातून सर्वात आधी मीनल इलिमिनेट झाली आणि ती बाहेर आली. त्यानंतर उत्कर्ष आणि विकास घराबाहेर आले. शेवटी घरात विशाल आणि जय हे दोघे स्पर्धक राहिले. त्यांच्यात विजेता कोण होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. कारण दोघेही अगदी तगडे स्पर्धक होते. दोघांमध्ये विशालला जास्त व्होट मिळाल्याने तो या शोचा विजेता झाला. त्याच्या चाहत्यांना या बातमीने खूप आनंद झाला. (Runner up winner of bigg boss 3 jay dudhane offered movie from mahesh manjrekar)
अशातच जय उपविजेता झाला आहे. जय देखील एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे. त्याची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. जयची पर्सनॅलिटी, त्याची बॉडी, ऍक्शन, आणि रोमान्स या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी बिग बॉसमध्ये पहिल्याच आहेत. मांजरेकरांनी देखील घरातील प्रत्येक सदस्याचा खूप चांगला अभ्यास केला आहे.
अशातच बिग बॉसच्या घराबाहेर पडताच जयला एक चित्रपट ऑफर केला आहे. महेश मांजरेकर त्यांचा आगामी चित्रपट ‘शनिवारवाडा’मध्ये जयला घेणार आहेत. याची माहिती त्यांनी सगळ्यांना दिली. या चित्रपटाबाबत अधिक माहितीत त्यांनी दिली नाही. परंतु लवकरच याबाबत ते घोषणा करतील.
जयने घरातील प्रत्येक टास्क खूप जबाबदारीने आणि हुशारीने पूर्ण केला आहे. त्याचा स्वभाव थोडासा रंगीत होता परंतु एक स्पर्धक म्हणून त्याने कधीही कोणत्याही गोष्टीत माघार घेतली नाही. विशाल आणि जय यांचे सुरुवातीपासून घरात कधीच पटले नाही. प्रत्येक कार्यात त्यांचे खटके उडत असत. परंतु शेवटी त्यांनीच एकमेकांना मिठी मारून घरातील लाईट बंद केल्या आहेत.
हेही वाचा :
‘हे’ आहे सलमान खानचे खरे नाव; जाणून घ्या त्याच्याशी संबंधित कधीही न ऐकलेल्या गोष्टी
प्रीती झिंटापासून ते सलमान खानपर्यंत, मृत्यूच्या धोक्यातून थोडक्यात बचावले बॉलिवूडचे ‘हे’ कलाकार
सनी लिओनीच्या गाण्यावर झालेल्या वादानंतर निर्मात्यांनी मागितली माफी, घेतला ‘हा’ मोठा निर्णय