सनी लिओनीच्या गाण्यावर झालेल्या वादानंतर निर्मात्यांनी मागितली माफी, घेतला ‘हा’ मोठा निर्णय


बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट किंवा गाणी आहेत. ज्यात धार्मिक भावना दुखावल्याचा उल्लेख आणि विरोध केला जातो. कधी कधी लोक खटलेही दाखल करतात आणि निर्मात्यांना माफी मागावी लागते. सनी लिओनीच्या (Sunny Leone) ‘मधुबन में राधिका’ या नवीन गाण्यातही तेच पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी हा व्हिडिओ धार्मिक भावना दुखावणारा असल्याचे म्हटले होते. आता सारेगामाने या गाण्याचे बोल बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

३ दिवसात बदलणार गाण्याचे बोल
निवेदन जारी करताना सारेगामा म्हणाले की, गाण्याबाबत अलिकडे आलेल्या प्रतिक्रिया आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन या गाण्याचे बोल ३ दिवसांच्या आत बदलले जातील. या गाण्याचे नवीन व्हर्जन तिन्ही प्लॅटफॉर्मवर शेअर केले जाईल आणि जुने हटवले जाईल. हे गाणे २२ डिसेंबरला प्रदर्शित झाले होते. ‘मधुबन में राधिका नाचे जैसे जंगल में नाचे मोर’ असे गाण्याचे बोल आहेत. ज्याला शारीब, तोशी रैना आणि कनिका कपूर यांनी गायले होते.

‘मधुबन में राधिका’ या गाण्याचे सुरुवातीचे बोल दिलीप कुमार यांच्या १९६० मध्ये आलेल्या ‘कोहिनूर’ या चित्रपटातून घेतले आहेत. जे मोहम्मद रफी यांनी गायले होते. शनिवारी उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पुजारी आणि भाविकांनी या गाण्याबाबत तक्रार केली होती की, त्यावर अश्लील डान्स केला जात असून, त्यावर बंदी घालण्यात यावी.

सनी अनेक प्रोजेक्ट्सचा एक आहे भाग
सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले, तर बॉलिवूड व्यतिरिक्त ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे आणि साउथ इंडस्ट्रीमध्येही ती आपली उपस्थिती नोंदवत आहे. ती मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘हेलन’, ‘कोका कोला’ आणि ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सारखे चित्रपट करत आहे.


Latest Post

error: Content is protected !!