वाढदिवशी गाडीसोबत फोटो शेअर करून रुपाली भोसलेने दिल्या स्वतःलाच शुभेच्छा, म्हणाली…


मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते‘ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. यातीलच नकारात्मक भूमिका साकारणारी संजना आणि अभिनेत्री रुपाली भोसले. रुपाली नकारात्मक भूमिकेत असूनही प्रेक्षकांमध्ये तिचा चांगलाच दबदबा आहे. रुपाली ही ‘मराठी बिग बॉस २’ ची स्पर्धक होती. त्यानंतर तिच्या चाहत्या वर्गात कमालीची भर पडली आहे. अशातच मंगळवारी (२९ डिसेंबर) रुपाली तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रुपालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा गाडीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की ती तिच्या कारसोबत उभी आहे. तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला आणि माझ्या कारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” यासोबत तिने लिहिले आहे की, “एक फोटो तो बनता है. तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच फोटोमधील तिचा स्टायलिश लूक देखील अनेकांना आवडला आहे. (Rupali bhosale share her photo with car and wish herself on birthday)

रुपाली ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेली अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘आयुषमान भव’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय

सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटासाठी ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

ट्विटरवर ‘अतरंगी रे’ विरोधात मोहीम, अक्षय-सारा अन् धनुषच्या चित्रपटावर ‘या’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

 


Latest Post

error: Content is protected !!