Monday, June 24, 2024

‘तुझे अक्सा बीच घूमा दूं’ गाण्यावर अनुपमा आणि अनुजने रस्त्यावर केला धमाकेदार डान्स

सध्या टेलिव्हिजन क्षेत्रात दबदबा असणारी आणि प्रेक्षकांवर भुरळ घालणारी मालिका म्हणजे ‘अनुपमा’. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर आणि टिआरपीच्या आकड्यांवर राज्य करणारी ही मालिका तर लोकप्रिय झाली, सोबतच या मालिकेतील पात्र आणि कलाकार देखील अमाप लोकप्रिय झाले. अनुपमा, वनराज, काव्या आणि अनुज या चौघांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. हे कलाकार ऑन कॅमेरा जरी एकमेकांशी सारखे भांडत असले तरी ऑफ कॅमेरा मात्र ते सर्व खूप मजामस्ती, धमाल करताना दिसतात. त्यांच्या या मजेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अनुपमाची सर्व टीम ऑफ कॅमेरा नेहमीच डान्स करताना दिसते. त्यांचे डान्स व्हिडिओ नेहमीच फॅन्स एन्जॉय करतात.

सध्या अनुपमा अर्थात रुपाली गांगुली आणि अनुज अर्थात गौरव खन्ना यांचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा डान्स व्हिडिओ सेटवरचा असून, शूटिंग दरम्यान मिळालेल्या ब्रेकमध्ये त्यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपमा आणि अनुज सलमान आणि प्रियांका यांच्या ‘तुझे अक्सा बीच घूमा दूं आ चालती क्या’ गाण्यावर डान्स करत आहे. या डान्समध्ये अनुपमा आणि अनुज दोघेही त्यांच्या गेटअपमधेच दिसत आहे. ऑफ कॅमेरा एवढी मस्ती करणारे हे सर्व गंभीर शूटिंग कशी करू शकतात.

शो बद्दल सांगायचे झाल्यास, काव्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आला असून, तिने शहा हाऊस स्वतःच्या नावावर केले आहे. तर आता अनुपमाच्या मनात अनुजबद्दल प्रेम निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. तर वनराजने आता पुन्हा यश मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या भागात अनुपमा तिचे अनुजबद्दलचे प्रेम स्वीकारत ते त्याला सांगणार का? वनराज यशस्वी होणार का? काव्याचे पुढचे पाऊल काय असेल? या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी अनुपमा ही मालिका पाहावीच लागेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा