अभिनेत्री ऋतुजा बागवे ही मराठी इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. खासकरून तिच्या सोज्वळपणासाठी ओळखली जाते. आजकाल ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. तिच्या या सुंदर पोस्टमुळे ऋतुजा बऱ्याचवेळा चाहत्यांच्या चर्चेचा विषय देखील बनते.
नुकताच ऋतुजा बागवेचा साडीतील एक व्हिडिओ समोर आला आहे. ऋतुजाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे, ज्यात ती कमालीची सुंदर आहे. या व्हिडिओमध्ये चाहत्यांना तिच्या मनमोहक अदा पाहायला मिळाल्या आहेत. साडीमध्ये ऋतुजाचं सौंदर्य खुललं आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (rutuja bagwe shared her pink saree look on social media)
ऋतुजाचा साडी लूक फ्लाँट करतानाचा व्हिडिओ चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “ब्युटीफुल नारी इन पिंक सारी.” या व्हिडिओवर लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांशिवाय, कलाकारही तिच्या या ग्लॅमरस लूकवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय ऋतुजाचे बोल्ड फोटोही बऱ्याचदा व्हायरल होत असतात. एकंदरीत प्रत्येक लूक ती अतिशय उत्तमरीत्या कॅरी करते.
सन २००८ मध्ये ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून ऋतुजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’,’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. यानंतर तिने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’ मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. आता अभिनेत्री ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-स्विमिंग पूलच्या कडेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही हृदयाचे ठोके
-शुभमंगल सावधान!!! राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकले विवाहबंधनात; लग्नसोहळ्याचे खास फोटो आले समोर