Saturday, June 29, 2024

‘सारेगमप’ला मिळाली विजेती, वेस्ट बंगालच्या नीलांजन बनीने जिंकली ट्रॉफी

गेल्या तीन महिन्यापासून झी टिव्हीवर सुरू असलेल्या ‘सारेगमप’ या गाण्याच्या रियॅलिटी शोचा अंतिम निकाल शेवटी लागला आहे. आपल्या सुमधूर आवाजाने अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. या कार्यक्रमाचा आता अंतिम निकाल समोर आला असून वेस्ट बंगालच्या निलांजनाने हा किताब पटकावला आहे. तिच्या या यशाचे सध्या सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. यावर नीलांजना हे आपला आनंद व्यक्त केला आहे.

झी टिव्हीवर सुरू असलेल्या ‘सारेगमप’ या कार्यक्रमाची दिर्घकाळ सगळीकडे चर्चा रंगली होती. सुमधूर आवाजाच्या या संगीत मैफिलीच्या विजेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच प्रत्येकाला उत्सुकता लागली होती. मात्र आता सगळ्यांची प्रतिक्षा संपली असून सारेगमप २०२१ च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहिर झाले आहे. बंगालच्या नीलांजना रायने सर्वाधिक मते मिळवत या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे.त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्यासोबतच या कार्यक्रमात राजश्री बर्गला द्वितीय तर शरद शर्माला तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. प्रथम क्रमांक मिळवलेल्या नीलांजनाला विजेतेपदाच्या ट्रॉफीसोबत रोख १० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत.तर राजश्रीला ५ लाख रुपये आणि शरद शर्माला ३ लाख रुपये इतकी रक्कम देण्यात आले आहे.

विजेतेपदाची माळ गळ्यात पडल्यानंतर नीलांजनाने आपला आनंद व्यक्त केला आहे. “मी सारेगमपा २०२१ चा किताब जिंकून खूपच आनंदी आहे. माझ्या या यशात प्रेक्षकांचा मोलाचा वाटा आहे, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. माझा या कार्यक्रमातील प्रवास संपला यावर विश्वासच बसत नाही” अशा शब्दात तिने आपला आनंद व्यक्त केला आहे.

याबद्दल पुढे बोलताना ती म्हणाली की, “मला या कार्यक्रमातून परिक्षक, स्पर्धक यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. मी या आठवणी कायम जपून ठेवीन. माझ्या सोबत असलेल्या अनेक स्पर्धकांशी माझी घट्ट मैत्री झाली.त्यांच्यासोबत घालवलेले क्षण मी कधीच विसरू शकत नाही. मला माझी कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी झी टिव्हीची खूप आभारी आहे” असेही ती यावेळी म्हणाली.

 

हे देखील वाचा