पतौडी घराण्याची लेक सबा अली खान सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ती सतत आपल्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. अशातच आता सबा अली खानने तिची आई शर्मिला टागोर आणि दिवंगत वडील मन्सूर अली खान पतौडी यांचा जुना फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. हा एक ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो आहे, ज्यामध्ये शर्मिला आणि मन्सूर अली शाही अंदाजात दिसत आहेत.
या ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोमध्ये शर्मिला आणि मन्सूर एका सोहळ्या दरम्यान जमिनीवर बसलेले दिसत आहेत. दोघांच्या गळ्यात हार आहेत. शर्मिला यांच्या कपाळावर मांगटिका असून, त्यांनी जड रेशमी ड्रेस परिधान केला आहे. तर, मन्सूर यांच्या खांद्यावर शाल आहे. खरं तर हा शर्मिला आणि मन्सूर यांच्या साखरपुड्याचा फोटो आहे, ज्यावर सबा अली खानचे चाहते भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत. (saba ali khan shares vintage picture from sharmila tagore mansoor ali khans engagement)
फोटोमध्ये शर्मिला वधूच्या वेशात बसलेल्या दिसत आहेत, तर मन्सूर अली खान त्यांच्या शेजारी बसले आहेत. दोघांच्या शेजारी नातेवाईकांचा मेळावा दिसतोय. शर्मिला या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. हा जुना फोटो शेअर करत सबा अली खानने कॅप्शन दिले आहे, “ती रॉयल वेडिंग… लग्नासाठी साखरपुडा करत असलेले आई -वडील… काश मीही तिथे असते… माशाअल्लाह.”
सबा अनेकदा तिची वहिनी करीना कपूर खान, पुतणे तैमूर, जेह आणि इब्राहिम, भाची सारा आणि भाऊ सैफ अली खान यांचे जुने फोटो शेअर करत असते. आता तिच्या आई आणि वडिलांचा हा साखरपुड्याचा चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांचे चाहते यावर कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-…आणि मरण्यापुर्वी स्मिता पाटील यांनी सांगितली होती ‘ती’ अनोखी शेवटची इच्छा.! काय होती ती इच्छा!
-हॅपी बर्थडे स्मिता पाटीलः स्मिता पाटील यांच्या ५ अविस्मरणीय भूमिकांना आज देऊयात उजाळा