Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर ह्रतिक रोशन आणि सबा आजादच्या लग्नाची तयारी झालीय सुरू?, सबा आजादची ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल

ह्रतिक रोशन आणि सबा आजादच्या लग्नाची तयारी झालीय सुरू?, सबा आजादची ‘ही’ पोस्ट होतेय व्हायरल

हिंदी चित्रपटक्षेत्रात सध्या लग्न आणि प्रेमप्रकरणांची जोरदार चर्चा सुरू आहे. रोज नवनवीन कलाकारांच्या प्रेमाच्या बातम्या सध्या ऐकायला मिळत आहेत,त्यांपैकी सध्या चर्चेत असणारी बातमी म्हणजे अभिनेता ह्रतिक रोशन  (Hritik roshan)आणि  सबा आजाद (saba azad) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू आहे. दोघेही अनेकदा हातात हात घालून एकत्र फिरताना दिसले आहेत. आजपर्यंत या नात्याबद्दल दोघांनीही कसलाही खुलासा केला नसला तरी सबा आजाद आणि ह्रतिकच्या घरच्यांचाही भेटीगाठी वाढल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत त्याचबरोबर दोघेही लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

ह्रतिक रोशन हा हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी आणि हँण्डसम अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांची, दमदार बॉडीची आणि देखण्या लूकची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. पत्नी सुजैनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तो खूपच एकाकी पडला होता, मात्र आता सबा आजाद आणि त्याच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही आता नेहमीच सोबत फिरताना दिसत आहेत. दोघेही आता लवकरच लग्र करण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. इतकेच नव्हेतर त्यांच्या लग्नाची तयारीही सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे. सबाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अलिकडेच ह्रतिक रोशनच्या कुटूंबाबद्दल एक पोस्ट केली आहे जी सध्या चर्चेत आहे.

या व्हायरल पोस्टमध्ये सबाने जेवणाचे फोटो शेअर करत घरचे जेवण दिल्याबद्दल ह्रतिक रोशनच्या घरच्यांचे आभार मानले आहेत.तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करत ह्रतिक रोशनची काकी कंचन रोशन, त्याची भाची सुरनिका आणि बहीण पश्मीना रोशनला टॅग केले आहे. सध्या तिची ही पोस्ट सगळीकडे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती ह्रतिक रोशनच्या घरच्यांसोबत ती दिसून आली आहे. या सगळ्या बातम्यांमुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबद्दल कोणतीही अधिकृत बातमी समोर आली नसली तरी ह्रतिकच्या घरच्यांची ही या लग्नाला संमती असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

हे देखील वाचा