पत्नी सुझैन खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आता त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिनेता सबा आझादला डेट करत आहे. दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच हृतिक-सबा एकत्र स्पॉट झाले होते.
अभिनेता हृतिक रोशनची आई पिंकी रोशन तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी पिंकी यांनी त्यांचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला. यादरम्यान त्याचा मुलगा हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझादही दिसली. साबाने हृतिकच्या आईच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये साडी परिधान करून भाग घेतला होता. सबा आझादचे रोशन फॅमिलीसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. पीच कलरच्या साडीमध्ये सबाचा सिंपल लूक खूपच सुंदर दिसत होता.
हृतिक रोशन आणि सबा आझाद एकत्र खूप क्यूट दिसत होते. या कपलला पाहून चाहतेही भरपूर कमेंट करत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील महत्वाची गोष्ट म्हणजे हृतिक सबाचा हात धरून चालत आहे, दोघेही एकमेकांचे हात धरून पोज देताना दिसत होते.
हृतिक रोशनची आई पिंकी रोशनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील सबाचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती हृतिक रोशनच्या कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये संपूर्ण रोशन कुटुंब दिसत आहे. सबा राकेश रोशनसोबत बसून पोज देताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
विशाल ददलानीने इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे प्रभावित झालेल्या मुलांना गाणे केले समर्पित, सोशल मीडियावर गाणे व्हायरल
वजन वाढविण्यासाठी एकावेळी तब्बल ४० अंडी खायचा प्रभास, ‘बाहुबली’साठी २०० कोटींच्या ऑफरलाही केलं बाय बाय