Tuesday, May 28, 2024

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबाने व्यक्त केले दुःख; म्हणाली, ‘माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे लोक माझ्यावर टीका करतात’

अभिनेत्री सबा आझाद सध्या कॉमेडी ड्रामा मालिका ‘Who’s ur Gynac’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या मिनी वेब सीरिजमध्ये सबा डॉक्टर विदुषीची भूमिका साकारत आहे, जी स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. मिनी सीरिजच्या प्रमोशनदरम्यान, सबाने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील आव्हानांबद्दल सांगितले आहे.

सबाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती वयाच्या चौथ्या वर्षापासून स्टेजवर परफॉर्म करत आहे, पण तिला अजून श्रेय मिळालेले नाही. सबाला पश्चात्ताप आहे की तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कदाचित तिच्या कामावर पूर्णपणे पडदा पडला आहे. सबा म्हणाली – “अर्थातच असे आहे कारण या गोष्टी लोकांच्या मनात रुजल्या आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे मी अनेक लोकांसमोर आले आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यामुळे लोक मला जज करतात, माझ्याबद्दल गृहीतक बांधतात. माझ्याबद्दल कोणी काय विचार करतंय याची जर मला काळजी वाटू लागली तर मी जे काम करतोय ते कसं करणार. जे लोक मला पाहून काहीही बोलतात ते माझ्याबद्दल काहीही बोलत राहतील. हे लक्ष अंगवळणी पडायला मला थोडा वेळ लागला. ”

काही काळापासून सबा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, त्यामुळे तिच्याबद्दलच्या बातम्या रोजच चर्चेत असतात. नुकतेच ते दोघे अर्जेंटिना येथे सुट्टीसाठी गेले होते, तेथून हृतिकने सबासोबतचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल काहीही लपवत नाहीत आणि एकमेकांबद्दलचे प्रेम उघडपणे जाहीरपणे व्यक्त करतात. हृतिकचा घटस्फोट झाला असून त्याचे सुझान खानसोबतचे पहिले लग्न संपले आहे. तो दोन मुलांचा बापही आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ट्विंकल खन्नाने आरवकडे मागितला पासवर्ड, मुलगा बोलला असं काही की, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
‘द वॅक्सीन वॉर’ आणि ‘चंद्रमुखी २’ला मागे सारत ‘फुकरे ३’ने बॉक्स ऑफिसवर केली दमदार कमाई

हे देखील वाचा