‘आम्हाला मुंबईचा अभिमान’, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर सचिन पिळगावकर यांची रोखठोक प्रतिक्रिया!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी प्रतिक्रिया दिल्या. शनिवारचा संपूर्ण दिवस या प्रकरणाने चांगलाच गाजला. यात बहुतेक सर्वांनीच कोश्यारी यांना चांगलेच खडसावून त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला. त्यावर आता मराठी सिनेसृष्टीतून देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर जेष्ठ सिनेअभिनेते सचिन पिळगावकर (sachin pilgaonkar) यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी येथील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी “गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर सचिन पिळगावकर यांनी त्यांचे मत मांडले आहे. याबद्दल बोलताना सचिन म्हणाले की, “ते काय म्हणाले त्याबद्दल फारसे माहिती नाही. त्यांनी असे का म्हटले हे त्यांनाच माहिती आहे. ते स्वत: खुलासा करतील. आमचे त्याबद्दल काही म्हणणे नाही. कुठल्याही राजकीय गोष्टीशी आमचा संबंध नाही. राजकारण आमचा बाज नाही. मात्र, आम्हाला मुंबईचा आणि मराठी असल्याचा अभिमान आहे” असे सचिन पिळगावकर यांनी म्हटले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

साऊथच्या ‘या’ ५ वेबसीरिजला तोडच नाही, हिंदीतही पाहण्याची सोय, एकाच क्लिकवर जाणून घ्या

डीपनेक ड्रेसमधील मलायकाच्या उघड्या अंगावर ठेवला व्यक्तीने हात, डोकंच धरून बसली अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

लेक न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणावर काजोलने सोडलं मौन, अभिनेत्रीचं विधान प्रत्येक आईसाठी महत्त्वाचं

Latest Post