Saturday, July 27, 2024

Death Anniversary: अनिता गुहा यांचा शेवटचा काळ होता वेदनादायक, अभिनेत्री आजार लपवण्यासाठी घ्यायची हेव्ही मेकअपचा आधार

बॉलिवूडमध्ये चित्रपटाची कथा कशीही असली तरी, अभिनेत्री मात्र अतिशय ग्लॅमरस आणि सुंदर पाहिजे. चित्रपटामध्ये कथेइतकेच अभिनेत्रीला महत्व असते. सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्री हेव्ही मेकअपचा आणि विविध कॉस्मेटिक सर्जरीचा आधार घेताना दिसतात. असे असूनही अनेकदा काही अभिनेत्रींना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या सुंदरतेवर परिणाम होऊन त्यांना काम मिळणे कमी होते. असेच काहीसे झाले एका दिग्गज अभिनेत्रींसोबत, जिने तिचा एका आजारामुळे खराब होणार चेहरा लपवण्यासाठी घेतला मेकअपचा सहारा.

बॉलिवूडमधला अतिशय यशस्वी सिनेमा म्हणून 1975साली आलेल्या ‘जय संतोषी माँ’ला ओळखले जाते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे आणि कमाईचे नवनवीन रेकॉर्ड तयार केले होते. मनोरंजनासोबतच लोकांना भक्ती आणि आस्थेशी जोडणारा सिनेमा म्हणून हा चित्रपट ओळखला जातो. जय संतोषी माँ सिनेमाने भलेही यशाचे नवनवीन रेकॉर्ड बनवले असले तरी, या सिनेमाला तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होणाऱ्या लोकांचे जीवन मात्र दुखणे भरलेले होते. जय संतोषी माँ सिनेमात संतोषी मातेची भूमिका अभिनेत्री अनीता गुहा यांनी साकारली होती.

अनिता गुहा यांनी 1950 साली ‘तांगावाली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 1959 साली आलेल्या ‘गूंज उठी शहनाई’ साठी त्यांना फिल्मफेयरच्या सहायक अभिनेत्रींच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी अनेक पौराणिक चित्रपटांमध्ये काम केले. तीन चित्रपटांमध्ये त्यांनी ‘सीता’ ही भूमिका साकारली होती. संतोषी माँ सिनेमानंतर तर लोकं त्यांना देवी सारखे समजू लागले आणि त्यांची पूजा करू लागले. व्यायसायिक जीवनात दमदार यश मिळत असताना वैयक्तिक जीवनात मात्र त्यांना अनेक दुःखांचा सामना करावा लागला.

आपल्या सुंदरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनिता गुहा यांना एक त्वचेचा आजार झाला हाेता, ज्यात त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर पांढरे डाग येण्यास सुरुवात झाली. यामुळे त्यांनी घरातून बाहेर पडणे कमी केले. जेव्हा जेव्हा त्या बाहेर पडायच्या तेव्हा तेव्हा त्या खूप मेकअप करायच्या, जेणेकरून त्यांच्या चेहेऱ्यावरील डाग कोणाला दिसणार नाही. तर दुसरीकडे माणिक दत्ता यांच्यासोबत त्यांचे वैवाहिक आयुष्य खूपच सुंदर होते. मात्र, त्या कधीच आई होऊ शकल्या नाही. याचे त्यांना आयुष्भर दुःख राहिले. त्यांच्या पतीचे माणिक दत्ता यांचे अचानक निधन झाल्यानंतर त्यांनी देखील जगापासून संपर्क तोडला आणि 20 जून 2007 साली वयाच्या 65व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.(sad story of jai santoshi maa movie fame actress anita guha)

अधिक वाचा-
प्रसिद्ध कोरिओग्राफरचे निधन, वयाच्या 53व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराचे झाले शिकार
28 वर्षांनी लहान अवनीतसोबतच्या किसिंग सीनबद्दल नवाजुद्दीनने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, ‘शाहरुख खान …’

हे देखील वाचा