अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध असतात. तर काही अभिनेत्री त्यांच्या लूकमुळे चर्चेत येतात. चाहते अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांची स्टाईल जशी असेल तशी करण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे त्या कलाकारांची स्टाईल चर्चेत येत राहतात. प्रसिद्ध अभिनेत्री साधना (sadhana)शिवदासानी यांची हेअरस्टाईल 60 वर्षांपूर्वीपासून प्रचंड प्रसिद्ध आहे. त्यांनी 1960साली ‘लव इन शिमला’ मध्ये काम केले. साधना अभिनयासोबतच त्यांच्या हेअरस्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. साधना अभिनेता धर्मेंद्रसोबत एका चित्रपटात काम करणार होत्या. पण त्याना तो चित्रपट करता आला नाही. याचं दु:ख आजही धर्मेंद्र व्यक्त करतात.
‘या’ कारणामुळे बदलली हेअरस्टाईल
दिग्दर्शक आर.के. नय्यर यांच्यासोबत काम करत असतानाच साधना त्यांच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर साधना यांनी 1166साली आर.के. नय्यरसोबत विवाह केला. दिग्दर्शक आर.के. नय्यरसोबत काम करताना साधना यांना त्यांची हेअरस्टाईल बदलावी लागली. कारण त्यांचे कपाळ खूपच रुंद होते. त्यामुळे दिग्दर्शकांनी कपाळ लपवण्यासाठी हेअरस्टाईल बदलण्याचा सल्ला दिला. त्यावेळी त्यांची बदललेली हेअरस्टाईल प्रचंड चर्चेत आली.
https://www.instagram.com/p/CT9kMuqsiQO/?utm_source=ig_web_copy_link
चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आले वाईट दिवस
साधना आणि आर.के. नय्यर यांच्या विवाहानंतरचे काही दिवस खूप चांगले गेले. परंतु नंतर नय्यर यांच्या चित्रपटाला नवे वळण आले आणि त्यांचे अनेक चित्रपट फ्लाॅप ठरले. त्यावेळी आर्थिक परिस्थिती बेताची होत गेली आणि त्यांच्यावर वाईट दिवस आले. मात्र, तेव्हा विवाहानंतर साधना यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. परंतू पतीवरील कर्ज फेडण्यासाठी साधना यांनी चित्रपटातसृष्टीत पुनरागमन केले.
‘या’ कारणास्तव केला चित्रपटसृष्टीला बाय बाय
साधना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “लग्नानंतर मी अभिनयक्षेत्रात परतले. मला वाटलं होतं की, पुर्वीसारखेच मला पात्र निभावण्याची संधी मिळेल. पण असे काही झालेच नाही. मला आई किंवा बहिण म्हणून पात्र निभावण्याच्या ऑफर मिळू लागल्या. त्या मला आवडत नव्हत्या. म्हणून मी चित्रपटसृष्टीला कायमचा बाय बाय केला.”
पतीचे झाले निधन
साधना यांचे पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आर.के.नय्यर यांचा मृत्यु 1995 मध्ये झाला. त्यांच्या मृत्यूनंतर साधना यांच्यावर आर्थिक संकट आले. तसेच पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्या एकट्या पडल्या. या दरम्यान, साधना यांची तब्येत खालावली. त्यांना थायरॉईड आजार होता. त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे साधना टाळत होत्या. थायरॉईड रोगाशी झुंज देत असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला.
घेतला जगाचा अखेरचा निरोप
जेव्हा साधना अत्यंत वाईट परिस्थितीतून जात होत्या, तेव्हा त्यांना कोणीही साथ दिली नाही. त्यावेळी साधना यांना स्वत:ची मुलेही नव्हती. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. तसेच त्यांच्यावर असलेले आर्थिक संकटही कोणी दूर करु शकले नाही. त्यामुळे त्यांना स्वत:लाच सर्व गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांनी अनेकदा चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी व इतर लोकांना मदत मागितली. पण कोणीही मदतीचा हात पुढे केला नाही. पतीच्या निधनानंतर साधना 20वर्षे एकट्या राहिल्या. साधना यांनी अखेर 2015मध्ये जगाचा निरोप घेतला.
हेही नक्की वाचा-
–तेजश्री प्रधानच्या सौंदर्याने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; पाहा फोटो
–खऱ्या मैत्रीचं नातं उलगडणारा ‘दिल दोस्ती दिवानगी’ रुपेरी पडद्यावर; चित्रपटाचे पोस्टर समोर