×

वाढदिवसाचे औचित्य साधून साई पल्लवीने शेअर केला तिच्या आगामी ‘गार्गी’ सिनेमाचा फर्स्ट लूक

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय आणि गाजणारी अभिनेत्री साई पल्लवी आज (९ मे) रोजी तिचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या खास दिवसाचे औचित्य साधून साई पल्लवीने तिच्या आगामी नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. साई पल्लवीने तिच्या आगामी ‘गार्गी’ सिनेमाच्या फर्स्ट लूकचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत सिनेमाबद्दल महिती दिली आहे. साई पल्लवीचा हा नवीन सिनेमा रिची फेम गौतम रामचंद्रन लिखित आणि दिग्दर्शित असणार आहे. मात्र हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल अजून माहिती दिली गेलेली नाही.

साई पल्लवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला की, या सिनेमाबद्दल बोलण्यासाठी तिने खूप वाट पाहिली. चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडिओ शेअर करत साई पल्लवीने लिहिले, “मी या चित्रपटाबद्दल तुम्हला सांगण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली आहे, आणि आज अखेर!!! माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने टीमने पोस्टर प्रदर्शित करण्याचे ठरवले. सादर करत आहोत गौतम रामचंद्रन यांचा ‘गार्गी’.”

View this post on Instagram

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai)

‘गार्गी’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर हा सिनेमा अशा महिलेवर भाष्य करतो जी न्यायासाठी लढत आहे. हा सिनेमा रविचंद्रन रामचंद्रन, ऐश्वर्या लेक्षी, थॉमस जॉर्ज आणि गौतम रामचंद्रन यांनी निर्मित केला आहे. साई पल्लवीला शेवटचे तेलगू सिनेमा असलेल्या ‘श्याम सिंघा रॉय’ चित्रपटात पाहण्यात आले होते. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करूनही साई पल्लवीने तिची पॅन इंडिया ओळख निर्माण केली आहे. मधल्या काळात एका मोठ्या ब्रँडच्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीला नकार दिल्यामुळे सई पल्लवी कमालीची प्रकाशझोतात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post