Wednesday, July 3, 2024

‘काऊन लोळायली बाई’, सई ताम्हणकर तिच्या ‘त्या’ लूकमुळे झाली सोशल मीडियावर ट्रोल,

ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या कामाचे अविभाज्य स्वरूप म्हणजे नेहमीच होणारे त्यांचे फोटोशूट. कलाकरांना नेहमीच वेगवेगळ्या रूपात, नवनवीन फॅशन ट्रेंडनुसार वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करावे लागते. हा त्यांच्या कामाचा एक मोठा भाग समजला जातो. कलाकार त्यांच्या फोटोशूटमधील अनेक फोटो सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत शेअर करतात. मराठीमधील अतिशय टॉपची अभिनेत्री असलेल्या सई ताम्हणकरने देखील नुकतेच तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. सध्या तिच्या या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. तिचा लूक आणि पोज पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर मजेशीर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सईने बॉलीवूडला देखील आपली दखल घेण्यासाठी भाग पडले. कृती सेननच्या ‘मिमी’ या सिनेमात तिच्या व्यक्तिरेखेचे तुफान कौतुक झाले. तिच्या या भूमिकेसाठी तिला आयफा आणि फिल्मफेयरचा पुरस्कार देखील मिळाला. मात्र आता सईला तिच्या एका फोटोशूटमुळे चांगलेच ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. सईला नेहमीच तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

सईने नुकतेच ‘संडे पिक्चर्स’ कॅप्शनने तिचे फोटो शेअर केले आहे. यात तिने काळ्या रंगाची पँट आणि रंगबेरंगी असा टॉप घातला असून, त्यात तिने जमिनीवर बसून पोज दिल्या आहेत. या पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिच्या लूकची तुलना कोणी पाळीशी तर तिच्या पोजची तुलना फारशी पुसण्याशी केली आहे.

एकाने कमेंटमध्ये लिहिले, “फरशी पुसताना चुकून तोल जातो तेव्हा,” तर दुसऱ्याने लिहले आहे “लादी पुसतानादेखील ग्लॅमर्स दिसते.” अजून एकाने लिहिले, “काऊन लोळायली बाई खाली व” एकाने लिहिले, “मोबाईल उलटा केल्यास पाल छताला चिटकलेली दिसते”, मात्र काहींना तिचा लूक चांगलाच आवडला आहे. तत्पूर्वी सईच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय ती काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात झळकली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न

‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल

हे देखील वाचा