×

सई ताम्हणकर पुन्हा एकदा अवतरली बोल्ड अंदाजात, कलाकारांनाही आवरला नाही कमेंट्स करण्याचा मोह

सई ताम्हणकरचा समावेश बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. तिच्या वेगवेगळ्या फोटो शूटमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचा प्रत्येक अंदाज खूप आवडत असतो. अशातच पुन्हा एकदा तिने सगळ्यांना घायाळ करणारे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सईने (sai Tamhankar) अलीकडेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने लाईट चॉकलेटी रंगाचा एक स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. परंतु या ड्रेसला तिने साडीचा लूक दिला आहे. त्यामुळे तिचा हा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. तिने मिडल पार्टेशन करून पोनिटेल घातला आहे. तसेच कानात मोठे ईअरिंग घातले आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ( Sai Tamhankar share her bold new photos on social media)

View this post on Instagram

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “चंगा लगदा मैनू आज.” तिचा हा लूक पाहून अनेक चाहते तसेच कलाकार कमेंट्स करत आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

हेही वाचा :

Latest Post