Thursday, December 19, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोणत्या गहन विचारात आहेत दाजी अन् मेव्हणा, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

आपल्या भारतात सण उत्सवाला खूप जास्त महत्व आहे. त्यात नुकताच रक्षाबंधन साजरी झाली आहे. यावेळी अनेक कलाकारांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तैमूर आणि इनाया या स्टार किडचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच कुणाल खेमूने (kunal kheu) त्याच्या इन्स्टा हँडलवर सैफ अली खानसोबतचा (saif ali khan) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत कुणालने एक मजेशीर कॅप्शन लिहिले आहे जे चाहत्यांना खूप पसंत केले जात आहे.

अलीकडेच कुणाल खेमूने त्याच्या इन्स्टा हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कुणाल आणि सैफ घरी बसून नाश्ता करताना दिसत आहेत. त्याचबरोबर जेवणाच्या टेबलावर एकच समोसा शिल्लक राहतो. हे पाहून कुणाल लिहितो की, “टेबलवरचा हा शेवटचा समोसा खायचा की नाही, ही खूप उत्सुकता आहे.” कुणालचे हे कॅप्शन चाहत्यांना खूप आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

 

एका चाहत्याने साहेब “तुम्ही खा, नंतर बघू,” अशी कमेंट केली. तर दुसर्‍या चाहत्याने कमेंट केली की, “हे खूपच मजेदार आहे.” कुणाल खेमूने २०१५ मध्ये सैफ अली खानची बहीण सोहा अली खानसोबत लग्न केले होते. त्याच वेळी, या दोघांना आता एक मुलगी आहे, इनाया खेमू, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुणाल खेमू हा प्रसिद्ध स्टार आहे. १९९३ मध्ये ‘सर’ या चित्रपटातून डेब्यू करून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत आपले नाव कमावले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

नंदिता वहिनींच्या मनमोहक अदा! फोटो पाहून नेटकरी फिदा

‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या आणि विजय देवरकोंडाने काढली शक्कल, थेट शेतात जाऊन केला रोमान्स

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट!

 

 

हे देखील वाचा