बुधवार (10 ऑगस्ट) रोजी हार्ट अटॅक आल्यानंतर एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते बेशुद्ध झाले होते आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राप्त माहितीनुसार 46 तास उलटून गेले तरीही अद्याप राजू श्रीवास्तव हे शुद्धीवर आलेले नाहीत. त्यांच्या चाहत्यांच्या काळजीत यामुळे भर पडली आहे. प्रकृती नाजूक असल्यामुळे राजू श्रीवास्तव सध्या व्हेंटिलेटरवर आहे. राजू यांच्या हृदयाच्या एका भागात तर 100 टक्के ब्लॉकेज आढळले आहेत.
आपल्या विनोदांमुळे आणि अभिनयामुळे राजू श्रीवास्तव यांनी प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या बातम्यांनी कला जगतात अस्वस्थता दिसत आहे. त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत असून अनेकांनी त्यांच्या तब्बेतीची फोनवरुन विचारपूस केली आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली होती.
हेही वाचा –
काय सांगता? ‘या’ मराठी अभिनेत्रीने बहिणीलाच बांधली राखी; म्हणे, ‘ती मला मोठ्या भावासारखीच’
कथित एमएमएसवर अंजली अरोराने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘माझ्या लहान भावानेही…’ .
जेठालालला मिळाली नवीन दया, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये ‘ही’ अभिनेत्री घेणार दिशा वकानीची जागा