Wednesday, September 18, 2024
Home बॉलीवूड मुलाच्या करिअरच्या प्रश्नावर सैफ म्हणाला; ‘त्याने आमिरचे ऐकावे, माझे नाही…

मुलाच्या करिअरच्या प्रश्नावर सैफ म्हणाला; ‘त्याने आमिरचे ऐकावे, माझे नाही…

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझन घेऊन येत आहे. या शोचा ट्रेलरही शनिवारी रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये आलिया भट्ट, करण जोहर, ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान, जान्हवी कपूर, रोहित शर्मा यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश असलेल्या या शोचा भाग असणाऱ्या पाहुण्यांची झलक देण्यात आली आहे.

ट्रेलरमध्ये अनेक भागांमधील मजेदार क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. यादरम्यान कपिल शर्मा पाहुण्यांसोबत हसताना आणि मस्करी करताना दिसला. बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या आगामी चित्रपटांचे प्रमोशन करत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत होते.

ट्रेलरच्या शेवटी कपिल शर्मा सैफ अली खानसोबत गप्पा मारताना दिसत आहे. तो म्हणतो, ‘याआधी आमीर खान आमच्या शोमध्ये आला होता, तो म्हणाला होता, ‘माझी मुलं माझं ऐकत नाहीत’. आता मला वाटतं, तुमचा मुलगा इब्राहिम अली खान अभिनयात पदार्पण करणार आहे, तो तुमचं ऐकतो का?’ यावर सैफ अली खान म्हणाला, ‘मला वाटतं की त्याने आमिर खानचं ऐकावं.’

कपिल शर्माचा शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्सवर २१ सप्टेंबरपासून प्रसारित होणार आहे. काही दिवसांपूर्वी एक टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, शनिवार हा फनीवार बनवला जाईल. या नवीन सीझनमध्ये कपिल शर्मा, किकू शारदा, सुनील ग्रोव्हर, राजीव ठाकूर आणि अर्चना पूरण सिंग आपापल्या भूमिकेत आणि अवतारात परततील. चित्रपट आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज कलाकारही या शोमध्ये दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

‘भूल भुलैया 3’ च्या प्रमोशनला सुरुवात; चित्रपटाच्या स्टारकास्टची जोरदार चर्चा
कंगनाने 18 वर्षे जुना व्हिडिओ शेअर केला, पूर्वीसारखे दिसण्याची केली इच्छा व्यक्त केली

हे देखील वाचा