बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) यांचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. करीना ही सैफची दुसरी पत्नी आहे. यापूर्वी सैफने अभिनेत्री अमृता सिंगसोबत (Amrita Singh) लग्न केले होते. हे लग्न १३ वर्षे टिकले. त्यानंतर २००४ मध्ये सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. माध्यमांतील वृत्तानुसार, सैफ आणि करीना यांच्यात २००८ मध्ये आलेल्या ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळीक वाढली होती.
अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. या लग्नापासून सैफ आणि करीनाला तैमूर अली खान (Taimur Ali Khan) आणि जहांगीर अली खान (Jehangir Ali Khan) ही दोन मुले आहेत. जेव्हा सैफ अली खानने करीना कपूरची आई बबिता (Babita) यांना अभिनेत्रीचा हात मागितला तेव्हा त्यांची प्रतिक्रिया कशी होती, हे जाणून घेऊया. एका चॅट शोमध्ये याबद्दल बोलताना करीना म्हणाली होती, “आम्ही काही काळ एकमेकांना डेट करत होतो. मग एके दिवशी अचानक सैफने मला सांगितले की, मी २५ वर्षांचा मुलगा नाही जो तुला रोज रात्री तुला घरी सोडायला येऊ.”
करीनाने सांगितले की, सैफ तिची आई बबिता यांच्याशी बोलला की, “मला माझे उर्वरित आयुष्य करीनासोबत घालवायचे आहे, आम्हाला एकत्र रहायचे आहे.” करीना कपूरच्या म्हणण्यानुसार, तिची आई खूप मस्त आहे आणि सैफकडून हे ऐकून तिने घाईघाईने होकार दिला.
करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खानही दिसणार आहे. हा चित्रपट अद्वित चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे, हा चित्रपट एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :