Friday, July 5, 2024

काय सांगता! राजेश्वरी करतेय लग्न? शालूचा ‘तो’ व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर आलं चर्चांना उधाण

‘फँड्री’मध्ये झळकलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात आजकाल खूपच चर्चेत असते. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर तिचा चांगलाच वावर असतो. तिची फॅन फॉलोविंग देखील तगडी आहे. इंस्टाग्रामवर तिला जवळपास तब्बल दीड लाखापेक्षाही अधिक युजर्स फॉलो करतात. म्हणूनच की काय, तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. तिच्या व्हिडिओ आणि फोटोंमुळे सतत सोशल मीडियावर चर्चा रंगत असतात. मात्र यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे.

सोशल मीडियावर सर्वत्र राजेश्वरीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. होय! राजेश्वरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून इंटरनेटवर तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. हा व्हिडिओ तिने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री वधूच्या वेशात दिसत आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे. सोबतच हातात हातमोजे देखील घातले आहे. न्यूड मेकअप आणि परफेक्ट हेअरस्टाईल केलेली राजेश्वरी या व्हिडिओमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. यात हातात पुष्पगुच्छ घेऊन ती तिच्या अदा दाखवताना दिसतेय. (sairat fame rajeshwari kharat getting married soon? see video)

व्हिडिओ शेअर करत राजेश्वरीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “सरप्राईज सरप्राईज… मी लग्न करतेय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?” तिने व्हिडिओ शेअर करताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते गोंधळात पडले आहेत. विशेष म्हणजे यात तिच्या व्यतिरिक्त कोणीही दिसत नाहीये. त्यामुळे राजेश्वरी खरंच लग्न करतेय, का हा तिच्या एखाद्या आगामी प्रोजेक्टचा संकेत आहे? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. दरम्यान या व्हिडिओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस देखील पाडला आहे. आगामी काळात राजेश्वरी नक्की काय करेल, हे पाहणे खरंच उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा