रिंकूने केला कुत्र्यासोबतचा एक गोंडस व्हिडीओ शेअर, चाहत्यांनी दिले भरभरून प्रेम

sairat fame rinku rajguru latest video with pet dog get viral


‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती वारंवार तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या पोस्टला चाहतेही भरभरून प्रेम देत असतात.

नुकतेच रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच, तिच्या चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्स करून बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या.

रिंकूने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुत्र्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. वास्तविक, ती कुत्र्याला तिच्यापासून लांब सरकवत असते. परंतु, कुत्रा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी कुत्रा तिथून निघून जातो व रिंकू त्याला बघून एक स्मित हास्य देते. व्हिडीओ शेेअर कराताना रिंकूने क‍ॅप्शनमध्ये ‘इतनी सी हसी’ असे लिहले आहे. याआधीही रिंकूने कुत्र्यासोबत तसेच मांजरीसोबतही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. यावरून रिंकूची प्राण्यांशी जवळीक दिसून येते.

रिंकू ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ या भूमिकेसाठी ओळखली जाते. 2015 मध्ये तिला 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विशेष उल्लेख पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘सैराट’ नंतर रिंकू ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या मराठी चित्रपटांमध्ये दिसली होती. रिंकू आता नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या आगामी हिंदी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. तसेच, चाहतेही चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.