Saturday, January 17, 2026
Home मराठी लॉकडाऊनचा रिकामा वेळ असा घालवतेय ‘आर्ची’, फोटो शेअर करत म्हणाली…

लॉकडाऊनचा रिकामा वेळ असा घालवतेय ‘आर्ची’, फोटो शेअर करत म्हणाली…

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठी चित्रपटाद्वारे रिंकू राजगुरूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने ‘आर्ची’ची भूमिका साकारली होती, जी प्रचंड गाजली. त्यामुळे प्रेक्षक आजही तिला ‘आर्ची’च्या नावाने संबोधतात. रिंकू या दिवसांत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना स्वतःविषयी माहिती व अपडेट देत राहते. नुकताच रिंकूने एक फोटो पोस्ट करून सांगितले आहे की, ती या लॉकडाऊनमध्ये कसा वेळ घालवत आहे.

नुकताच आर्चीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर जो फोटो पोस्ट केलाय, तो चाहत्यांना खूप आवडला आहे. आपणा सर्वांना माहित आहे की, रिंकूचे प्राणी मात्रांवर किती प्रेम आहे. ती सतत तिच्या कुत्र्यासोबत आणि मांजरीसोबत फोटो शेअर करत असते. या फोटोमध्येही रिंकू एका मांजरीसोबत दिसली आहे. खरं तर तिच्या हातामध्ये एक पुस्तक आहे आणि ती ते वाचत आहे. त्याचवेळी एक गोंडस मांजर तिच्या मांडीवर बसलेली पाहायला मिळाली. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “घरी राहा, सुरक्षित राहा.”

या फोटोलाही नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. यासोबत, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनेही फोटोवर ‘क्यूट’ म्हणून कमेंट केली आहे. चाहतेही आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘अनपॉज्ड’ हा चित्रपट रिलीझ झाला आहे. याशिवाय तिने अलीकडेच, ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हा हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पँटलेस हुडी घालून जिममध्ये पोहोचली ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदाना; कॅमेऱ्यात कैद झाले तिचे क्यूट एक्सप्रेशन्स

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीने शेअर केले नवीन फोटो, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘अगं पडशील ना!’

-कमालच म्हणायची! वयाच्या ४४ व्या वर्षीही अभिनेत्री दिसते खूपच आकर्षक, सोशल मीडियावरील फोटोंनी लावली आग

हे देखील वाचा