Thursday, April 18, 2024

पूजा हेगडेसोबत रोमान्स करणार अहान शेट्टी, नवीन ‘सनकी’ चित्रपटाची केली घोषणा

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीचा (Suneil Shetty) मुलगा अहान शेट्टीने 2021 मध्ये मिलन लुथरियाच्या ‘तडप’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर तो आता त्याचा पुढचा चित्रपट घेऊन येत आहे. अहान शेट्टीने त्याच्या आगामी ‘सनकी’ चित्रपटासाठी साजिद नाडियादवालासोबत हातमिळवणी केली आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात अहान पूजा हेगडेसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. आज शनिवारी, निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.

चित्रपट निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या ‘सनकी’ चित्रपटाची आज, शनिवार, 9 मार्च रोजी घोषणा करण्यात आली आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये पूजा हेगडे पहिल्यांदाच अहान शेट्टीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. पुढील वर्षी व्हॅलेंटाईन डेला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाची घोषणा करताना निर्मात्यांनी सांगितले की, ‘सनकी’ 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

अहान शेट्टी त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या चित्रपटात तो एक अनोखी आणि विलक्षण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. आजकाल अनेक फ्रेश कपल्स थिएटरमध्ये पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत आता प्रेक्षक अहान शेट्टी आणि पूजा हेगडे यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल उत्साह आहे. रजत अरोरा यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अदनान ए. शेख आणि यासिर जाह दिग्दर्शित.

‘सनकी’ पुढच्या वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अहान शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, त्याने ‘तडप’ चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. या चित्रपटात तो तारा सुतारियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला होता. ‘तडप’ प्रेक्षकांमध्ये विशेष प्रभाव निर्माण करण्यात अपयशी ठरला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

देवाचे दर्शन घेऊन कार्तिक आर्यनने सुरु केली ‘भूल भुलैया 3’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
‘तू या पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्त्री आहेस’, सुकेश चंद्रशेखरने पत्र लिहून जॅकलिनला दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा

हे देखील वाचा