Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

साजिद नाडियाडवालाच्या पुढच्या चित्रपटात दिसणार रजनीकांत ! दिग्दर्शकाने फोटो शेअर करून दिला इशारा

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) लवकरच ‘वेट्टियाँ’ चित्रपटात दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याशिवाय आता अभिनेता आणखी एका चित्रपटाशी जोडल्याची बातमी समोर येत आहे. रजनीकांत लवकरच साजिद नाडियादवालासोबत एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांनी नुकतेच या सुपरस्टारसोबत काम करण्याचे संकेत दिले आहेत.

साजिद नाडियादवाला (sajid nadiyadwal) यांनी अलीकडेच X (पूर्वीचे ट्विटर) वर रजनीकांतसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. साजिदने फोटो शेअर करत लिहिले, ‘महान रजनीकांत सरांसोबत काम करणे हा खरा सन्मान आहे, आम्ही या प्रवासात पुढे जाण्याची तयारी करत असताना उत्साह वाढत आहे.’ याशिवाय त्याच्या टीमने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत हे मोठे सहकार्य आहे. हे दोन दिग्गज एकत्र येण्याची शक्यता आणि उत्सुकता वाढत आहे.

चाहते साजिदच्या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि दोघांच्या सहकार्यासाठी आणि आगामी प्रोजेक्टसाठी अभिनंदन करत आहेत. तसंच रजनीकांत दिग्दर्शकाच्या पुढच्या चित्रपटात काम करताना दिसणार असल्याच्याही चर्चा आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, या दोघांनीही अद्याप कोणत्याही चित्रपटाबद्दल किंवा त्यांच्या प्रोजेक्टबद्दल उघडपणे बोललेले नाही.

रजनीकांतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो नुकताच ‘लाल सलाम’ चित्रपटात दिसला होता. 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुपरस्टार एका छोट्या भूमिकेत दिसला. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये विष्णू विशाल आणि विक्रांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने याचे दिग्दर्शन केले आहे. साजिद नाडियादवालाबद्दल बोलायचे झाले तर त्याने बॉलिवूडला ‘किक’, ‘हाऊसफुल सीरीज’, ‘जुडवा 2’ सारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. याशिवाय त्याचे ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘हाऊसफुल 5’ हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत प्रशांत दामले यांनी केली नव्या ॲपची घोषणा
Nawazuddin Siddiqui : ‘स्मिता पाटील यांच्यापेक्षा सुंदर अभिनेत्री नाही’, नवाजुद्दीन सिद्दीकी असं का म्हणाला?

हे देखील वाचा