Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘छिछोरे’ चित्रपटानंतर नितेश तिवारी अन् साजिद नाडियादवाला यांच्या ‘बवाल’ चित्रपटाचा टिझर रिलीज

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘छिछोरे’ चित्रपटानंतर नितेश तिवारी अन् साजिद नाडियादवाला यांच्या ‘बवाल’ चित्रपटाचा टिझर रिलीज

बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपटाचा टीझर बुधवारी (5 जुलै)ला रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. वरुण आणि जान्हवीचा हा पहिलाच एकत्र चित्रपट आहे, ज्यात ते राेमान्स करताना दिसणार आहेत.

वरुण (varun ) आणि जान्हवी (janhvi kapoor) यांच्या चित्रपटाचा टीझर इमोशन, ड्रामा आणि प्रेमाने भरलेला आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडमध्ये सॅड गाणेही ऐकू येत आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 21 जुलै रोजी प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

मंगळवारी, चित्रपटाच्या संबंधित एक पाेस्ट इंस्टाग्राम हँडलवर शेअर करताना वरुण आणि जान्हवीने सांगितले की, ‘बुधवारी दुपारी 12 वाजता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला जाईल.’ या पाेस्टमध्ये जान्हवी प्रिंटेड रेड ड्रेसमध्ये, तर वरुण शर्ट-पँटमध्ये दिसत आहे. ही एक रोमँटिक पाेस्ट आहे. दोघांनी या फोटोसोबत कॅप्शन लिहिले, ‘तुम्ही प्रेम करू दिले असेत, तर किती प्रेम केले असते.’

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘छिछोरे’ चित्रपटानंतर नितेश तिवारी आणि साजिद पुन्हा एकदा या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. आधी हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट 21 जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटाबाबत नितेश तिवारी म्हणाले, “चित्रपटाचे शूटिंग भारतातील तीन ठिकाणी आणि युरोपातील काही ठिकाणी झाले आहे. त्याची कथा अतिशय आकर्षक आहे आणि दृश्ये नाट्यमय आहेत. या चित्रपटात वरुण आणि जान्हवीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर प्रसारित झाल्यानंतर , ताे देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल. या चित्रपटासाठी आम्ही खूप उत्कटतेने आणि बांधिलकीने काम केले आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

साजिद नाडियादवालाच्या टीमने त्यांचे एक स्टेटमेंट शेअर केले आहे, ज्यामध्ये लिहिले होते की,’बवाल’ हा माझ्यासाठी खूप खास चित्रपट आहे. नितेश तिवारीसोबत पुन्हा काम करताना आनंद झाला. वरुण आणि जान्हवीने या चित्रपटात आपले सर्वोत्कृष्ट दिले आहे.(bollywood movie bawaal teaser out actor varun dhawan janhvi kapoor film to release on 21st july )

अधिक वाचा-

‘या’ कारणास्तव समंथाने सिनेसृष्टीतून घेतला ब्रेक, निर्मात्यांचा अॅडव्हान्सही केला परत
प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा