Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

साक्षी तंवर करणार टेलिव्हिजनवर वापसी, बडे अच्छे लगते हैं २ मध्ये दिसणार ‘या’ भूमिकेत

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘बडे अच्छे लगते है २’ हा लोकप्रिय शो असून, सगळ्यांच्याच आवडीचा शो आहे. राम आणि प्रिया यांच्या अवतीभोवती फिरणारी कहाणी सर्वानाच भावते. नकुल मेहता आणि दिशा परमार यांची जोडी सर्वांनाच आवडत आहे. ‘बडे अच्छे लगते है २’ हा शो एकता कपूरच्या ‘बडे अच्छे लगते है’ शोचा रिमेक आहे. पहिल्या बडे अच्छे लगते है मालिकेत राम कपूर आणि साक्षी तंवर मुख्य भूमिकेत होते. या पहिल्या भागाने अमाप लोकप्रियता मिळवली. आता मिळणारी महिती नुसार पुन्हा एकदा साक्षी या मालिकेत दिसणार आहे.

साक्षी मालिकेत पुन्हा दिसणार असल्यामुळे तिचे फॅन्स आणि मालिकेचे फॅन्स खूपच खुश असून पुन्हा एकदा साक्षीला मालिकेत बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत. साक्षीने तिच्या शूटिंगला देखील सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. मात्र साक्षी या मालिकेत कोणत्या भूमिकेत दिसणार नसून ती तिच्या आगामी नेटफ्लिक्सवरील ‘माई’ या सिरिजला प्रमोट करताना दिसणार आहे. या भागासाठी मालिकेत एक खास प्लॉट देखील तयार करण्यात आला आहे.

साक्षीला एकता कपूरच्या ‘कहाणी घर घर की’ मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. या शोमुळे साक्षी टेलिव्हिजन स्टार म्हणून ओळखली जाऊ लागली. साक्षीने अनेक चांगले शो टीव्हीवर केले. तिला टीव्हीची महाराणी म्हणून देखील संबोधले जाऊ लागले. मात्र पुढे साक्षीने २०१६ साली टीव्ही क्षेत्रात काम कमी करून बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. साक्षीने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. तिचा ‘दंगल’ सिनेमा खूपच गाजला यात तिने आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

साक्षीची लवकरच ‘माई’ ही सिरीज प्रदर्शित होणार आहे. यात साक्षी तिच्या मुलीची हत्या करणाऱ्या लोकांचा शोध घेताना दिसणार आहे. या सिरीजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांनी भरपूर चांगला प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा