‘आर्या २’ वेब सिरीजचे पोस्टर शेअर करत सलमान खानने केले सुष्मिता सेनचे कौतुक


सलमान खान बॉलीवूड मधील त्याच्या मैत्रीसाठी खूपच जास्त ओळखला जातो. सलमान नेहमीच त्याच्या मित्रांसाठी नेहमीच हटके काहीतरी करताना दिसतो. त्याचे इंडस्ट्रीमध्ये असंख्य मित्रमैत्रिणी आहेत. याच सर्वांमधील त्याची खूप चांगली मैत्रिण असणारी अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. सध्या सुश्मिता तिच्या ‘आर्या’ या वेबसिरीजच्या दुसऱ्या पर्वासाठी खूपच प्रकाशझोतात आली आहे. नुकतीच ही वेबसिरीज प्रदर्शित झाली असून, तिचे खूप कौतुक होत आहे. या वेबसिरीज मधील सुष्मिता सेनच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. फॅन्ससोबतच कलाकारही तिच्या या अभिनयाबद्दल तिची स्तुती करत आहे. आता सलमान खानने देखील सुश्मिता सेनचे कौतुक केले आहे. याबद्दल त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सलमान खानने एक फोटो शेअर केला आहे जिथे रस्त्यावर ‘आर्या २’ होर्डिंग दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘अरे वा तू खूप छान दिसत आहे मी तुझ्यासाठी खूप खुश आहे’. त्याच्या या पोस्टवर सुश्मिताने देखील रिप्लाय दिला असून, तिने असे लिहिले आहे की “थँक यु व्हेरी मच माय जान नेहमीप्रमाणे उदार आणि प्रेमळ.”

सुश्मिता सेन शिवाय सलमान खानच्या पोस्टवर चाहत्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहते कमेंट करत त्यांच्या मैत्रीचे कौतुक करत ‘ती शेवटपर्यंत निभावणार’ असे लिहिले आहे. तर एका चाहत्याने लिहिले की, ‘भाईने तिच्या वेबसिरीजचे प्रमोशन केले आहे म्हणजे तो सिनेमा, सिरीज हिट आहे.’

सुश्मिता सेन पाच वर्षापासून इंडस्ट्रीतून दूर होती. ‘आर्या’ सिरीजमधून पुनरागमन केले. तिच्या या भूमिकेला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. तिने या वेबसिरीसमध्ये खूप खूप चांगले काम केले आहे. त्यासाठी तिचे प्रेक्षक कौतुक देखील केले आहे.

हेही वाचा –

लग्नानंतर कॅटरिना-विकी यांना कलाकारांनी दिल्या महागड्या भेटवस्तू, रणबीर-सलमानचे गिफ्ट ऐकून नक्कीच होतील डोळे पांढरे

अभिनेत्री अंकिता लोखंडेवर चढला हळदीचा रंग, विक्की जैनसोबत केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

सलमानच्या चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाली होती बहीण अलवीराची ‘लव्हस्टोरी’, तर ‘अशी’ होती कारकीर्द

 


Latest Post

error: Content is protected !!