सलमानच्या चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाली होती बहीण अलवीराची ‘लव्हस्टोरी’, तर ‘अशी’ होती कारकीर्द

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) कु़टूंब खूप मोठे आहे. ते सगळेजण मोठ्या आनंदाने एकत्र राहतात. सलमान त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. त्यातही बहिणी अलवीरा आणि अर्पितावर त्याचा खूप जीव आहे. अशातच अलवीरा खान अग्निहोत्री सोमवारी (१३ डिसेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अलवीरा आज ५२ वर्षांची झाली. तिचा जन्म १३ डिसेंबर १९६९ मध्ये इंदौरमध्ये झाला. अलवीरा व्यवसायाने एक कॉस्ट्यूम डिझायनर आणि प्रोड्यूसर आहे. तिने आपल्या करिअरची सुरूवात अभिनयाने नाही, तर असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट डायरेक्टरचे काम केल्यानंतर तिने ग्राफिक्स डिझायनर म्हणूनही काम करण्यास सुरूवात केली.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

साल १९९३मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘जागृती’ या चित्रपटासाठी अलवीराने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. २००८ पासून तिने चित्रपट निर्माता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर १९९६ साली अभिनेता अतुल अग्निहोत्री याच्यासोबत अलवीरा विवाहबंधनात अडकली. सलमान खानच्या ‘जागृती’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानच अतुल अलवीराची भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Happy birthday special story of alveera khan)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अलवीराने निर्मिती केलेल्या चित्रपटांपैकी जास्त चित्रपट हे सलमान खानचेच आहेत. अलवीराने सर्वात पहिल्यांदा २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॅलो’ चित्रपटाची निर्मिती केली होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचा पती अतुल अग्निहोत्रीने केले होते. तसेच २००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉडीगार्ड’ चित्रपट देखील अलवीराने प्रोड्यूस केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये ‘ओ तेरी’ आणि २०१९ मध्ये ‘भारत’ या दोन चित्रपटांसाठी देखील अलवीराने प्रोड्यूसरचे काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ चित्रपटात सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांनी मुख्य भुमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी अलवीराला बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनरचा स्टारडस्ट अवॉर्ड मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Atul Agnihotri (@atulreellife)

दरम्यान, अलवीराचा पती अतुलने एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील किस्सा सांगितला आहे. एक दिवस अचानक अलवीराने तिच्या वडिलांसोबत त्याची भेट करून दिली असल्याचे अतुलने सांगितले. त्यावेळी अलवीराचे वडिल सलींम खान यांनी अलवीरा-अतुलच्या नात्याला परवानगी दिली आणि १९९६ साली अतुल-अलवीरा विवाहबंधनात अडकले.

हेही वाचा-

Latest Post