Friday, July 5, 2024

स्टेजवर डान्स करताना अचानक सलमान खानला काय झालं? व्हिडिओ पाहून चाहते चकित

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) दबंग टूर दरम्यान दुबईतील एका कार्यक्रमात स्टेजवर डान्स करत होता. सलमान खान आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) (Salman Khan and Pooja Hegde video) यांनी यावेळी त्यांच्या परफॉर्मेंसने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. परंतु अभिनेत्यासोबत असे काही घडले. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सलमान खान स्वतःचीच हुकअप स्टेप विसरला, जे पाहून भाईजानचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.

वास्तविक, सलमान खान आणि पूजा हेगडे अभिनेत्याच्या प्रसिद्ध ‘जुम्मे की रात’ गाण्यावर डान्स करत आहेत. तेव्हा तो त्याच्या हुकअप स्टेप करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात तो अयशस्वी होतो. सलमान खान आणि पूजा हेगडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (salman khan failed to complete his hook up step on jumme ki raat song)

सलमान खान आणि पूजा हेगडेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये, हे पाहिले जाऊ शकते की त त्यांचे हुकअप स्टेप करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अभिनेत्री स्टेजवर पुढे-पुढे चालत आहे. पूजा स्टेजवर थांबताच, सलमान खान तिच्या ड्रेसचा धागा दातांनी पकडण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही तो डान्स स्टेप पूर्ण करू शकत नाही. स्टेजवर स्वत:च्या स्टेप्स पूर्ण करत नसल्याचा सलमान खानचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

‘जुम्मे की रात’ हे मूळ गाणे सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिसवर बनवले गेले आहे. या गाण्यात सलमान जॅकलीनचा ड्रेस दातात धरून तिच्या मागे चालतो. पण कार्यक्रमादरम्यान हुकअप स्टेप करण्याचा भाईजानचा प्रयत्न अयशस्वी झाला. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले, तर अभिनेता पूजा हेगडेसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात दिसणार आहे. सलमान आणि पूजा लवकरच त्यांच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

हेही वाचा – 

हे देखील वाचा