Monday, July 1, 2024

उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेताना दिसला सलमान खान, चाहते म्हणतायेत, ‘भाई पाण्यातही साप असतो’

बॉलिवूडचा मेगास्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या ‘टायगर ३’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या तुफान यशानंतर त्याच्या चाहत्यांना या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि सलमान खान यांची जोरदार केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या भाईजानच्या दोन व्हायरल फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या फोटोवर फक्त चाहतेच नव्हेतर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणते आहेत ते व्हायरल फोटो चला जाणून घेऊ.

सलमान खान हा हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. भाईजानच्या नावावरंच कोणताही चित्रपट यशस्वी होतो हि त्याची खासियत आहे. हिंदी चित्रपट जगतातील सर्वात देखणा आणि हँण्डसम अभिनेता अशी सलमानची ओळख आहे. चित्रपटांइतकाच सलमान खानच्या सोशल मीडिया पाोस्टचीही नेहमीच चर्चा रंगलेली असते. त्याच्या दमदार शरीरयष्टीचे फोटो तर चाहत्यांना अगदीच वेड लावत असतात. सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या दोन व्हायरल फोटोंची जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी सलमानची खिल्ली उडवलेली दिसत आहे. हे फोटो सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.

या व्हायरल फोटोंमध्ये सलमान खान एका तलावात पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहे. डोक्यावर हॅट घातलेला सलमान खान फोटोंमध्ये खूपच दमदार दिसत आहे. उन्हाच्या झळा तोंडावर पडलेल्या अवस्थेत काढलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री प्रिती झिंटाने “मिस यू” म्हटले आहे, तर ड्रामा क्विन राखी सावंतने “वा भाई” म्हणत या फोटोचे कौतुक केले आहे. त्याच  बरोबर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही किती गोड म्हणत फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोवर भाईजानच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना खिल्ली उडवली आहे.

एका चाहत्याने या फोटोवर प्रतिक्रिया देताना “भाई लक्ष असू दे, पाण्याातही साप असतात” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकाने “पाण्यात मासे असतील ते पण पकडं” असा सल्लाच सलमान खानला दिला आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने आता “पुढच्या चित्रपटात मगरीची भूमिका मिळणार” असे म्हणत भाईजानची चांगलीच चेष्टा केली आहे. सध्या सलमान खानचे  हे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानला त्याच्या फार्म हाऊसमध्ये सर्पदंश झाला होता. या बातमीने संपुर्ण चित्रपट जगतात खळबळ माजली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा