×

दुसऱ्यांच्या लग्नात घुसून घातला गोंधळ, अक्षय कुमारच्या ‘सारे बोलो बेवफा’ गाण्याने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा एक विविध गुण संपन्न अभिनेता आहे. त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका तो अगदी चोखपणे बजावत असतो. त्याच्या चाहता वर्ग एवढा मोठा आहे की, त्याच्या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. अशातच त्याच्या बच्चन पांडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातील ‘सारे बोलो बेवफा’ या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. गाण्यात अक्षय कुमार लग्नाला जाताना व वधूसमोर गोंधळ घालताना दिसत आहे. या गाण्याचा व्हिडीओ चाहत्यांना एवढा आवडला आहे की, या व्हिडिओला 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

अरोसा खान या गाण्यात नववधूच्या भूमिकेत दिसत आहे, जिच्या डान्स नंबरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. ‘सारे बोलो बेवफा’ या गाण्याच्या यशानंतर अरुसा खान खळबळ माजली आहे. लोक त्याच्या आत्मविश्वासाची आणि मस्त नृत्य कौशल्याची प्रशंसा करत आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार ज्या दिवशी अरोसा खानने तिचा पहिला चित्रपट ‘बच्चन पांडे’ साइन केला त्याच दिवशी तिला कायद्याची पदवी मिळाली. ‘सारे बोलो बेवफा’ अभिनेत्री आरोसा खान साजिद नाडियादवालाच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’मध्ये क्रिती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट निर्मित, हा चित्रपट १८ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनेकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातील आणि देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. अक्षय कुमार हा नेहमीच काही ना काही नवीन घेऊन येत असतो त्यामुळे त्याचे चाहते नेहमीच त्याच्या नवीन प्रोजेक्टची वाट पाहत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आमिर खानने घेतला चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय, कारण जाणून किरण राव झाली भावुक

जॉन अब्राहमला भूतकाळातील चुकांचा पश्चाताप, म्हणाला ‘एक चांगला जोडीदार आणि माणूस बनू शकलो असतो’

BIRTHDAY SPECIAL : राधिका रावने इंडी पॉपला दिले नवे नाव, रशियाच्या संकटावर बनवला चित्रपट

Latest Post