Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड अखेर सलमान आणि शाहरुख खान येणार सोबत, 25 जानेवारीला मिळणार सिनेप्रेमींना डबल ट्रीट

अखेर सलमान आणि शाहरुख खान येणार सोबत, 25 जानेवारीला मिळणार सिनेप्रेमींना डबल ट्रीट

सलमान खान म्हणजे यशाची ग्यारंटी मानली जाते. त्याचा फ्लॉप सिनेमा देखील १०० कोटींच्या पार जाऊन व्यवसाय करतो. तर शाहरुख खान हा बॉलिवूडचा आणि बॉक्स ऑफिसचा बादशाह आहे. असे दोन मोठे आणि दिग्गज ‘खान’सोबत आले तर बॉक्स ऑफिसवर केवढा मोठा धमाका होईल? दोन्ही खान्सचे फॅन्स त्यांना सोबत बघण्यासाठी आतुरलेले आहेत. या दोघांची मैत्री देखील खूपच खास आहे. ते दोघे नेहमीच एकमेकांना प्रमोट करताना दिसतात. आता लवकरच सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टिझर ‘पठाण’सोबत प्रदर्शित केला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, या सिनेमासोबतच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे या दोघांच्या फॅन्ससाठी ही एक मोठी आणि डबल धमाका असणारी ट्रीट ठरणार हे नक्की. नुकतेच सलमान खानने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले, “‘किसी का भाई किसी की जान’ आता पहा मोठ्या पडद्यावर २५ जानेवारीला”. याचाच अर्थ असच होतो की, सलमानच्या या सिनेमाचा टिझर पठाणसोबत रिलीझ केला जाईल. सलमान खानने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो मोठ्या केसांमध्ये दिसत असून, त्याच्या केसांच्या मागे सलमानचा एक रफ लूक दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह त्याच्या फॅन्सने देखील आनंद व्यक्त केला आहे.

तत्पूर्वी शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा २५ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असून, या सिनेमाची प्रतीक्षा मागील बऱ्याच काळापासून केली जात आहे. या सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग देखील फुल्ल झाली असून, हे पाहूनच या सिनेमाची फॅन्समध्ये असलेली क्रेझ लक्षात येत आहे. तब्बल ४ वर्षांनी शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वच लोकं उत्सुक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खिलाडी कुमार आणि सिरिअल किसर पहिल्यांदाच एकत्र, पाहिलात का चित्रपटाचा ट्रेलर?
सुनील शेट्टीच्या दिलदार अंदाजाने जिंकले चाहत्यांचे मनं, मराठी भाषेत म्हणाला, ‘आम्ही सर्वजण…’

हे देखील वाचा